महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा वोट फार ओपीएस मोहिमेचा संकल्प

191

 

 

नागभीड (प्रतिनिधी- संजय बागडे 9689865954)

नागभीड: दिनांक 7 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना तालुका शाखा नागभीडच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

या पत्रकार परिषदे त राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धरतीवर लागू केलेली एनपीएस व यूपीएस योजना कर्मचाऱ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने किती अन्यायकारक आहे व जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्याच्या कशी हिताची आहे यासंबंधी स्पष्टीकरण देण्यात आले.

1नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या महाराष्ट्रातील कोणत्याही कर्मचाऱ्याला पेन्शन लागू नाही, त्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना सतत अनेक आंदोलन करीत आहे. याच पार्श्वभूमीवर 15 सप्टेंबर 2024 ला महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने शिर्डी येथे राज्य महाअधिवेशन आयोजित करण्यात आलेले होते. हे राज्य महा अधिवेशन आयोजित करूनही राज्य सरकारने कुठलेही पाऊल न उचलल्यामुळे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने दिनांक 2 ऑक्टोंबर 2024 पासून वर्धा येथे आमरण उपोषण आंदोलन सुरू केले होते.

या आमरण उपोषणामध्ये राज्याध्यक्ष वितेश जी खांडेकर त्याचबरोबर राज्य पदाधिकारी मिळून एकूण 17 लोकं आमरण उपोषणाला बसले होते. परंतु या राज्य सरकारने आमरण उपोषणाला बसून सुद्धा कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. सतत पाच दिवस हे उपोषण सुरू होतं परंतु कुठल्याही राज्य सरकारचा प्रतिनिधी त्या ठिकाणी आले नाही व दखल घेतली नाही. परंतु उपोषणकर्त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत होती. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम पेन्शन शिलेदारांनी राज्य कार्यकारिणीला आव्हान केलं की, आपण हे उपोषण तूर्तास थांबवावं, याला स्थगिती द्यावी जेणेकरून आपल्याला भविष्यातील लढाई आणखी जोमाने लढता येईल. पेन्शन शिलेदारांच्या हाकेला दाद देत राज्य कार्यकारिणीने आमरण उपोषणाला स्थगिती दिली. परंतु त्याच वेळेला एक संकल्प केला की जर आपल्या आमरण उपोषणाला जर हे सरकार दाद देत नसतील तर आगामी विधानसभा निवडणूक ही निर्णायक आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रात तालुक्याच्या वतीने वोट फॉर ओ पी एस म्हणजे जो पक्ष जुनी पेन्शन देण्याला समर्थन देईल त्यांनाच आम्ही मतदान करणार या आशयाची मोहीम राबविण्याचा संकल्प उपोषणाला स्थगिती देताना करण्यात आलेला आहे.

राज्य कार्यकारिणीने केलेल्या या आव्हानाला अनुसरून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना तालुका शाखा नागभीड च्या वतीने तालुक्यात वोट फार ओपीएस ची मोहीम सक्रियपणे राबविण्याचा निर्धार केला. या मोहिमेच्या धर्तीवर तालुका शाखा नागभीड च्या वतीने प्रत्येक कर्मचाऱ्यांपर्यंत व कर्मचाऱ्यांच्या आप्तस्वकीयांपर्यंत पोहचून वोट फार ओपीएस मोहीम म्हणजे जो देईल पेंशन त्यालाच देऊ समर्थन ही मोहीम सक्रियपणे राबविण्याचा निर्धार केला.

या प्रसंगी तालुकाध्यक्ष सतीश मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत मंदे, तालुका उपाध्यक्ष मंगेश कोरे, महिला अध्यक्षा रुपाली पाथोडे, सचिव पिराजी कांदे, संघटक महिपाल मांढरे, संघटक केशव मिसार, महिला उपाध्यक्षा दीप्ती मडावी मॅडम उपस्थित होते.