अवैध रेतीचे वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त

490

 

 

चिमूर- चिमूर वनपरिक्षेत्र शंकरपूर उपवन क्षेत्रातील नवतला बीटातील संरक्षित वनामध्ये रेती भरलेले ट्रॅक्टर जप्त करण्यात आलेले आहे ट्रॅक्टर मालक व मजुरावर वन कायद्यांतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहे. ही कारवाही मंगळवारी दुपारी करण्यात आली आहे.

मौजा नवतळा बीटातील महारमजरा येथे गट क्रमांक 468 मध्ये वन कर्मचारी गस्त करीत असताना त्यांना ट्रॅक्टरचा आवाज आला. सर्व कर्मचारी जवळ जाऊन पाहिले असता त्या ट्रॅक्टरमध्ये रेती भरून आढळून आले. संरक्षित वनामधून रेती चोरून नेणे हे वन कायद्यानं अंतर्गत गुन्हा असल्याने ट्रॅक्टर मालक व चालक आणि हमाल यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले आहे.

हे दोन्ही ट्रॅक्टर शंकरपूर येथील भूषण दळवे यांचे असल्याची माहिती प्राप्त झाली असून एक ट्रॅक्टर आरमोरी येथील हरिदास कोटरंगे यांचे नावाने असल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे तसेच या ट्रॅक्टर चे चालक प्रमोद रंदये व भारत मानकर तसेच रेती भरणारे मजूर सागर रंदये, आशिष नन्नावरे, मोरेश्वर रंदये, प्रमोद रंदये, गौरव दडमल, अभय रंदये सर्व राहणार शंकरपूर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे तसेच ट्रॅक्टर व ट्रॅक्टर मधील साहित्य चिमूर येथील वन विभागाच्या कार्यालयात जमा करण्यात आले आहे.
ही कारवाही वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर, क्षेत्र सहाय्यक संतोष ओतकर, वनरक्षक विशाल सोनुने, कालिदास गायकवाड, राहुल सोनुने, गस्तीपथकचे वनपाल नैताम, वनरक्षक पोटे,जगदीश लांजेवार, सुनील लांजेवार, प्रदीप ढोणे यांनी केली.