भारतीय संविधानवर रविवारी राज्यस्तरीय कार्यशाळा

23

 

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लहान मुला-मुलींना सोप्या भाषेत भारतीय संविधान समजून सांगण्यासाठी बालसाहित्य कलामंच आणि निर्मिती फिल्म क्लब यांच्यावतीने रविवार दि. 13 ऑक्टोंबर, 2024 रोजी दुपारी 12:00 ते सायं. 5:00 या वेळेत राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
वीस वर्षाच्या आतील मुला-मुलींना यामध्ये सहभागी होता येईल. प्रवेश फक्त 50 मुला-मुलींना असेल. भारतीय संविधानाचे अभ्यासक संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तर अनिल म्हमाने, डॉ. शोभा चाळके, अ‍ॅड. करुणा विमल, विश्वासराव तरटे यांच्या प्रमुख उपस्थितीत अंतिमा कोल्हापूरकर, आदित्य म्हमाने, शर्वरी पाटोळे, दिक्षा तरटे, अर्हंत मिणचेकर, मंथन जगताप, अश्वजित तरटे, तक्ष उराडे, नमिता धनवडे, प्रज्ञा पाटोळे यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
सदर कार्यशाळेला भारतीय संविधान प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन अंतिमा कोल्हापूरकर यांनी केली आहे.