सौ. सुनिता प्रसाद सोनवणे यांना राज्यस्तरीय योग नारीरत्न पुरस्कार जाहीर

35

 

धुळे: साईकला बहुउद्देशीय संस्था धुळे अंतर्गत शिव योग केंद्राच्या संस्थापिका आणि शिव एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या सचिव सौ. सुनिता प्रसाद सोनवणे यांना कै. श्री. माणिकराव एज्युकेशन फाउंडेशन, कोल्हापूर यांच्याकडून राज्यस्तरीय योग नारीरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. या सन्मानाने त्यांना योग क्षेत्रात अधिक उभारी मिळेल आणि त्यांच्या कामाची दखल घेतली गेल्याने निश्चितच प्रेरणा मिळेल.

सौ. सुनिता सोनवणे यांनी गेली तीन वर्षांपासून योगाचा अभ्यास सुरू केला असून त्यांनी साईकला बहुउद्देशीय संस्था अंतर्गत शिव योग केंद्राची स्थापना करून अनेक योग शिबिरे यशस्वीरीत्या आयोजित केली आहेत.तसेच त्यांनी आयुष मंत्रालय प्रमाणित या ठिकाणी योग पदवी संपादित केली आहे. तसेच नुकतेच त्यांना 21 जून 2024 रोजी अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ यांच्याकडून देखील सन्मानित करण्यात आले. नियमित योग वर्गात ते असंख्य साधकांना मार्गदर्शन करत आहेत आणि योगाच्या प्रचार-प्रसारासाठी अहोरात्र कार्य करत आहेत.
सौ. सुनिता यांनी या पुरस्काराचा सन्मान घेतला असताना आपल्या भावनाही व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “या सर्व प्रवासात माझे पती आणि सासू-सासऱ्यांनी नेहमीच मला पाठींबा दिला, त्यांच्यामुळेच मी हा प्रवास सुरू ठेवू शकले आहे आणि या पुढेही सुरू राहील. आजच्या धकाधकीच्या जीवनात योग हे शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक साधन आहे. प्रत्येकाने योगाचा अवलंब करून जीवन सुसंगत आणि समाधानी करावे.” योग ही शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक शांती देणारी प्राचीन कला आहे. सुनिता सोनवणे यांचे योग क्षेत्रातील कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे.