समकालीनतेचा लोकशाहीर शरद शेजवळ यांच्या लोकप्रबोधन गीतातून उजळली मुक्ती पहाट मुक्ती महोत्सवाची उत्साहात सांगता.

9

 

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक -: ऐतिहासिक मुंबई इलाका दलित वर्ग परिषदेच्या माध्यमातून 13 ऑक्टोबर 1935 रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी येवला मुक्कामी केलेली धर्मांतराची ऐतिहासिक घोषणेचा 89 वा वर्धापन दिन येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्ती भूमी स्मारक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनराव भुजबळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मुक्ती महोत्सव समितीच्या माध्यमातून बुद्ध आंबेडकर सामाजिक प्रबोधन गीतांचा बहारदार कार्यक्रम नाशिक येथील लोककवी वामनदादा प्रतिष्ठान कलापथकाचे समकालीनतेचा लोकशाहीर शरद शेजवळ यांच्या प्रमुख कला अभिव्यक्तीतून आंबेडकरी शाहिरी जलसा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सालाबादप्रमाणे यावर्षीही लाखोंचा जनसमुदाय मुक्ती भूमी येवला येथे महामानवाच्या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी बाबासाहेबांच्या प्रति आपली बांधिलकी व प्रेरणा कायम करण्यासाठी जमला होता. लोककवी वामनदादा कर्डक यांच्या सिद्धहस्त लेखणीतून तयार झालेल्या

उद्धरिले कोटी कुळे।
भीमा तुझ्या जन्मामुळे।। जखडबंद पायातील साखळदंड। तळा तड तुटले तू ठोकताच दंड।।
झाले गुलाम मोकळे ।
भीमा तुझ्या जन्मामुळे ।।
या अजरामर गीताने शरद शेजवळ यांनी मुक्ती पहाट या लोकप्रबोधन गीतांच्या मैफिलीचा लोकांना आस्वाद दिला.

लोक रंजनातून लोकप्रबोधन करत शाहीर शेजवळ यांनी

जरी संकटाची काळ रात्र होती। तरी भीमराया तुझी साथ होती।। गिनतीच माझी गुलामात होती। जिंदगीच माझी सलामत होती।।

गीताने श्रोत्यांना मग मंत्रमुग्ध केले दस्तुरखुद्द नामदार छगनराव भुजबळ साहेब यांच्यासाठी त्यांनी विशेष गीत सादर केले वामनदादा कर्डक यांच्या शब्दात हे गीत असून त्या गीताचे बोल होते.

वाट फुलेंची सोडून आंबेडकरांना तोडून तुम्हा चालताच यायचं नाय।तुम्हा हलताच घ्यायच नाय।

मनुच आंगड टोपडं माझ्या आंबेडकराला।
घालतात यायचं नाय।

फुटाया लागलं तांबडा फुलेंच
पहाट कोंबडं।
तुम्हा दालताच हायचं नाय।
सोडून तथागताला वामन तुझ्या रथाला।हलताच यायाच नाय।।

हे गीत सादर केले दस्तर खुद्द भुजबळ साहेब यांनी या गाण्याची यावेळी स्तुती केली.

त्रिसरणाची मंगल वाणी घुमते मंगल धानी बुद्धम् शरणं गच्छामि संगम शरणं गच्छामि या गीताने वामनदादांच्या लेखणी अभिव्यक्तीला श्रुत यांनी टाळ्यांच्या गजरा अभिवादन केले आंबेडकरी शाहिरी जलशा हा महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी शाहिरी जलसा चा वारसा असून सामाजिक प्रबोधन हा या गीतांचा मुख्य उद्देश राहिला आहे आंबेडकरी शाहिरी जळशाच्या केंद्रभागी समस्त मानवाचे कल्याण असून जातीयंताची चळवळ अधिक बळकट करणे त्या दृष्टिकोनातून यावेळी वेगवेगळी सामाजिक प्रबोधनाची गीते गायली गेली धार्मिक व जातीय सलोखा ही काळाची गरज असून त्यासाठी जाणवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी प्रबोधन गीतांच्या माध्यमातून करण्यात आले यावेळी जितेंद्र शेजाळ पाटील साक्षी- गौरी या गायक भगिनी त्याचप्रमाणे विजय भोंडगे ढोलक सिद्धार्थ गुंजाळ ढोलकी राहुल सोनवणे शिंदे साईजर या वाद्यावर सात संगत करत केली.भिमानुयायी ह्यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते