गुणवंतराव देशमुख विद्यालय कवडीपुर येथील विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड

7

 

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855

पुसद- क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय शालेय वेटलिफ्टिंगच्या स्पर्धेत गुणवंतराव देशमुख विद्यालय कवडीपुर पुसदच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये निवड झाली .

दिनांक १५ ऑक्टोंबर २०२४ रोजी रिधोरा जिल्हा अकोला येथे पार पडल्या . यामध्ये गुणवंतराव देशमुख विद्यालय कवडीपुर येथील १७वर्ष वयोगटामध्ये ४५वजन गटात कु. वर्षा बुरकुले द्वितीय क्रमांक पटकाविला , ४९वजन गटात पूजा ठेपेकर प्रथम प्रथम क्र.पटकविला,७६वजन गटात दिव्या कल्याणकर प्रथम क्रमांक पटकाविला,५५वजन गटात सुरज इंगोले प्रथम प्रथम क्रमांक, ८९वजन गटात पियुष आढावे प्रथम क्रमांक पटकाविला तसेच१९वर्षे वयोगटामध्ये ७३वजन गटात योगेश धाड प्रथम ,८९वजन गटात सुफियान खान प्रथम क्रमांक पटकाविला तर१०२वजन गटात फैजान खान प्रथम प्रथम क्रमांक पटकाविला .
वरील विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड झालेली आहे. शाळेचे क्रीडा मार्गदर्शक अविनाश कऱ्हाळे व रोशन देशमुख यांनी अथक परिश्रम घेतले.

शाळेचे अध्यक्ष .ऍड. आशिषभाऊ देशमुख , मुख्याध्यापक अजय खैरे व सर्व शिक्षक वृंद यांनी त्यांचे कौतुक केले. व पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.