डी.के.आरीकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

29

 

 

 

चंद्रपूर- येथील दलीतमित्र आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त पत्रकार तथा समाजसेवी डी.के.आरीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रय कॉलनी गुरुद्वारा जवळ तुकुम येथे विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले.
पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डी.के.आरीकर हे आपला प्रत्येक वाढदिवस वृक्षारोपण व पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार घेऊन साजरा करत असतात, आजवर त्यांनी हजारो वृक्षांचे रोपण व संवर्धन केले आहे. याच कार्यक्रमात कल्पना पी.आरीकर यांनी सुद्धा वृक्षारोपण करून आपला वाढदिवस साजरा केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिराचंद बोरकुटे हे होते संचालन प्रदीप अडकीने तर आभार प्रदर्शन वैशाली रोहनकर यांनी केले.
या प्रसंगी हरीश ससनकर, डॉ.देव कन्नाके, पी. एस. आरीकर, ऍड.वैशाली टोंगे कवाडे, मनोहर जाधव, वर्षा कोठेकर, प्रा. माधव गुरनुले, अरुण धानोरकर, एच. बी. पटले, शुभांगी डोंगरवार, आशिष येडांगे, विनायक धोटे, सपकाळ साहेब, भगवान वारकर, सुधाकर मोकदम, अतुल ठाकरे, संजय फाले, किशोरभाऊ पोतनवार, नारायण देवतळे, दिनेश एकवणकर,बब्बूभाई इसा, विलास गौरकर, एच. एम. भोवते,रंजना आरीकर, अविनाश भोयर, शिरीष बागडे, राजू जिल्हेवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.