अटी व शर्तीच्या अधीन राहून मिरवणूक प्रचार रॅली व सभेसाठी रीतसर अर्ज सादर करा-वरोरा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आवाहन

42

 

सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी, मो. नं. ८६०५५९२८३०

चंद्रपूर, दि. 19 : भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. त्याकरीता 75 – वरोरा विधानसभा मतदारसंघांतर्गत निवडणूक प्रक्रियेत प्रचार रॅली, मिरवणुका व सभेकरिता परवानगी मिळण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षेत स्थापन करण्यात आलेल्या एक खिडकी परवानगी कक्षामध्ये अर्ज सादर करण्यात येतो, परंतु निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शन पुस्तिकेनुसार नमूद केलेल्या अटीच्या अधीन राहून परवानगी प्रदान करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे.
परवानगी मागणारा राजकीय पक्ष / उमेदवार निर्धारित नमुन्यात जोडपत्र ड -एक खर्च योजनांच्या तपशीलासह 48 तास आधी संबंधित निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयात परवानगीसाठी कक्ष प्रभारीकडे अर्ज करेल. कोणत्याही राजकीय पक्षास/उमेदवारास अर्ज केल्याच्या सात दिवसाच्या आत आयोजित करावयाचे कार्यक्रम प्रचार यात्रा / मिरवणुका यासंदर्भात परवानगीसाठी अर्ज करता येईल. एका विशिष्ट दिवसासाठी एकापेक्षा जास्त कार्यक्रमासाठी स्वतंत्र अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
त्यानुसार 75 – वरोरा विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शन पुस्तिकेतील नमूद अटींच्या अधीन राहून निवडणूक प्रक्रियेत प्रचार रॅली, मिरवणुका व सभेबाबत परवानगी अर्ज सादर करण्यात यावा, असे आवाहन वरोराच्य उपविभागीय अधिकारी तथा वरोरा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी दोन्तुला जेनित चंदा यांनी केले आहे.