डी. के. आरीकर यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ सावलीच्या ग्रामीण रुग्णालयात फळ आणि बिस्कीट वाटप

63

 

सावली ( ता.प्र.) :- चंद्रपूर येथिल ,दलितमित्र,व आदिवासी सेवक,तसेच संस्थापक अध्यक्ष पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र राज्यआणि जेष्ठ पत्रकार डी.के.आरीकर तसेच सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा चिंतलवार,पांडूरंग लेनगुरे यांचा वाढदिवसाचे औचित्य साधुन ग्रामीण रुग्णालय सावली येथे सामाजिक कार्यकर्ता, पर्यावरण संवर्धन व विकास समिती कार्याध्यक्ष सावली तालुका प्रशांत तावाडे यांचा हस्ते फळ आणि बिस्कीट वाटप करण्यात आले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांचे विचार अंगीकारत दलितमित्र, आदिवासी सेवक,तसेच संस्थापक अध्यक्ष पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र राज्य आणि जेष्ठ पत्रकार डी.के.आरीकर यांनी ग्राम स्वच्छतेला महत्व देत असून युवा वर्गासाठी प्रेरणास्थान आहेत.यातच त्यांनी पुन्हा आपल्या सामाजिक कार्यातून समाजसेवेची आवड त्यांनी सर्वांना दाखवून दिली,त्यांचा या सामाजिक कार्याची सर्व स्तरावरून स्वागत होत आहे.त्यांचा वाढदिवस सावली येथील रुग्णालयात फळ व बिस्कीट वाटप करून साजरा करण्यात आला.

फळ व बिस्कीट करण्याकरिता स्वतः डी. के. आरीकर, डॉ. देव कन्नाके, इंजि. प्रदीप अडकीने, वैशाली रोहणकर, रंजना आरीकर तशेच ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी वृंद मोठया संख्येने उपस्थित होते.