✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड : – (दिनांक २५ ऑक्टोंबर) तालुक्यातील मिलिंद महाविद्यालय मुळावा रेड रिबन क्लब च्या माध्यमातून एच आय व्ही विषाणू एड्स जनजागृती व समाजात असलेल्या गैरसमज या संदर्भात कार्य करणाऱ्या या क्लब ने आज दिनांक २४ ऑक्टोंबर रोजी आयसीटीसी उपजिल्हा रुग्णालय उमरखेड येथे भेट दिली.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना तालुका समुपदेशक वैशाली धोंगडे उपजिल्हा रुग्णालय उमरखेड यांनीएचआयव्ही विषाणू एड्स आजाराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले हा आजार कसा होतो होऊ नये.
याकरिता कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या पाहिजे आणि आजाराची लक्षणे १०९७ हेल्पलाइन नंबर या संदर्भात सविस्तर मार्ग दर्शन केले आयसी टीसी विभाग उपजिल्हा रुग्णालय उमरखेड यांचे कार्य कशाप्रकारे केले जाते.
यासंदर्भात सुद्धा त्यांनी माहिती दिलीरेड रिबन क्लबच्या माध्यमातून महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यां चा एक सक्रिय गट समाजामध्ये एड्स आजारा विषयी जनजागृती करतो समाजात असणारे विविध गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न या युवकांद्वारा केला जातो अनेक जनजागृती पर कार्यक्रमाचे आयोजन वर्षभर केले जातात.
रॅली विविध स्पर्धा या माध्यमातून हा क्लब सक्रिय पद्धतीने समाजामध्ये जाऊन एच आय व्ही विषाणू एड्स बाबतआजाराबाबत प्रबोधनात्मक कार्य करतो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यावेळी रुग्णालयातील गर्भवती महिला आणि रुग्ण यांना फळांचे वाटप केले.
या संपूर्ण अभ्यास दोऱ्याचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमअधिकारी तथा रेड रिबन क्लब नोडल अधिकारी प्रा. ज्योती खंदारे आणि सह कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ अनिल काळबांडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी रुग्णालयातील विविध विभागांना भेटी दिल्या आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित पोस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त आशिष दिलीप सुरोशे द्वितीय क्रमांक कु अश्विनी सुरोशे तृतीय क्रमांक कु सुजाता चव्हाण यांना स्पर्धा परीक्षा पुस्तक मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देण्यात आली.
मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांनी या अभ्यास दौऱ्यात सहभाग घेतला दुपारच्या सत्रात उमरखेड पोलीस स्टेशनला विद्यार्थ्यांनी भेट दिली.
यावेळी ठाणेदार शंकर पांचाळ यांनी कायदा व सुव्यवस्था यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक fitness कडे लक्ष देण्याचे आवाहन केले यावेळी पोलिस स्टेशनच्या विविध विभागांना विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या राऊत मॅडम यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून स्पर्धेपरीक्षे च्या युगात स्वतःला टिकवून ठेवा विद्यार्थ्यांना त्यांनी प्रोत्साहित केले एकंदर अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोठी भर पडली.