पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या चिमूर येथील १२ नोव्हेंबर च्या जाहीर सभेला उपस्थित राहण्याचे सहकार्य करा- भाजप उमेदवार बंटी भांगडिया

236
Advertisements

 

सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी मो. 8605592830

नागभीड – मागील १० वर्षा पासून आपल्या कडून प्रेम आशीर्वाद दिल्यामुळे मला संधी मिळाली. त्यामुळे आपल्या विश्वासाच सोनं केले. प्रेम, विश्वास, आशीर्वाद टिकवून ठेवण्यासाठी काम करतोय. चिंतन मतदार राजानी करायचे आहे. भाजप महायुती सरकारने शेतकरी, बोनस, पीकविमा, नुकसान भरपाई, विद्युतच्या कल्याणकारी योजनाची माहिती देत योजना देऊन यशस्वी झालो. विरोधकांच्या प्रचारास बळी पडू नका. बोजां मुक्त करून लाडली बहीण योजना, निराधार योजना त वाढ करणे, शेतकरी राजाला कर्ज मुक्त करण्याचे वचन देत असल्याचे सांगत भाजप महायुती उमेदवार बंटीभाऊ भांगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या चिमूर येथील १२ नोव्हेंबर च्या जाहीर सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

 

सोनुर्ली येथे आयोजित सभेच्या मंचावर भाजप जेष्ठ नेते वसंत वारजूकर, भाजप तालुका अध्यक्ष संतोष रडके, सरपंच मंजुषा म्हसके , राकाचे भाऊराव डांगे, हेमंत लांजेवार आदी उपस्थित होते. संचालन नेताजी शेंडे यांनी केले. मोठया संख्यने नागरीक उपस्थित होते.