सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी मो. 8605592830
चिमूर – भारताने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्विकारल्या नंतर २६ जानेवारी १९५० रोजी देशात लागु करण्यात आले. संविधान स्विकारून पंच्च्याहत्तर वर्ष झाले तरीही देशातील नागरीक संविधाना प्रती जागृत नाहीत. संविधानाला फक्त कायद्याचेच पुस्तक समजुन त्याचे कडे दुर्लक्ष केल्या गेले. मात्र संविधान हे या देशातील प्रत्येकाच्या उन्नतीचा जाहिरनामा असल्याचे मत भारतिय बौद्ध महासभेचे केंद्रीय प्रशिक्षक शेषराव सहारे यांनी व्यक्त केले.
थोर देशभक्तांच्या कठोर परिश्रमातून भारताचे संविधान निर्माण केल्या गेले. देशात २६ नोव्हेंबरला संविधान दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जातो. मात्र संविधान स्विकारल्या नंतर पंच्चाहत्तर वर्ष होऊनही नागरीकात संविधानाप्रती जागृती नसल्याचे चित्र आहे. त्यामूळे चंद्रपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक सहाय्यक संस्था द्वारा संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात संविधान जन जागृती जागर रथयात्रा द्वारे करण्याचा संकल्प केला.
८ नोहेम्बर पासुन चंद्रपूर वरून संविधान जागर रथ निघाला. १० नोव्हेंबर रोज रविवारला चिमूर शहरात रथाचे आगमन झाले. रथ शहरातील मुख्य मार्गाने फिरविण्यात आले. यावेळेस रथा सोबत असलेले मुख्य मार्गदर्शक भारतिय बौद्ध महासभेचे केंद्रीय प्रशिक्षक शेषराव सहारे, अखिल भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, अखिल भारतीय बौद्ध महासभेचे माजी सचिव पत्रकार सुरेश डांगे, पत्रकार प्रा. राजु रामटेके , जितेंद्र सहारे इत्यादी सहभागी झाले होते.
शहरातून मार्गक्रमण करून रथ तक्षशिला बुद्ध विहार येथे आले. बुद्ध वंदना करून मार्गदर्शक शेषराव सहारे यांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शनात त्यांनी पुढे संविधान जागर कशासाठी करायचे याचे महत्व विषद करताना सांगितले की, संविधानाचे केंद्रस्थानी असलेल्या भारतीय नागरिकाला प्रतिष्ठेचे जीवन प्राप्त करून देण्याचे उद्देश ठेऊन न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे नीतीचे चार तत्व स्वीकारले आहे.नागरीकांचे मूलभूत अधिकार/ हक्क तसेच त्यांची कर्तव्य आणि राज्याची मार्गदर्शक तत्वे ही भारतीय नागरिकांपर्यंत पोहोचवुन त्यांना जागृत करणे, संविधानाने धर्मापेक्षा राष्ट्र प्रेमाला अधिक महत्त्व दिलेले असून आम्ही प्रथम भारतीय आहोत आणि शेवटी ही भारतीयच आहोत. लोकशाहीचे दोन शत्रू हुकूमशाही आणि माणसा माणसात भेद करणारी संस्कृती होय. भारतीय मतदाराला त्याच्या मताचे मूल्याची जाणीव करून द्यावी, अल्पशा लाभापोटी त्याने मत विकता कामा नये. व्यक्ती स्वातंत्र्याची मूल्य कितीही मोठी व्यक्ती असेल तरी तिच्या चरणी वाहू नका.लोकशाही टिकविण्यासाठी राजकीय समतेला सामाजिक व आर्थिक समतेची जोड असली पाहिजे, अन्यथा लोकशाही उध्वस्त होईल. वेगवेगळ्या धर्माची वेगवेगळ्या कायद्याची छावणी निर्माण करणे हे राष्ट्रनिर्मितीसाठी घातक असल्याचे सांगितले. त्यामुळे सविधान प्रेमी बंधू भगिनींनी संविधान जागर रथाच्या उपक्रमात सामील होऊन राष्ट्र कार्याला सहकार्य करण्याचे आवाहन सहारे यांनी केले.