कृष्ण गीता नगर येथे पंकज मिस्तरी यांच्या घरी चोरी अज्ञात चोरट्यांनी फोडले घर अन् ५० हजारांचा ऐवज केलेला लंपास

208
Advertisements

 

धरणगांव – पी डी पाटील सर

धरणगांव – शहरातील नगरपरिषद हद्दीतील कृष्ण गीता नगर येथील रहिवासी फर्निचर चे काम करून आपली उपजीविका भागविणारे पंकज मिस्तरी यांच्या घरी दि.१० नोव्हेंबर, २०२४ ला मध्यरात्री अज्ञात तीन चोरट्यांनी चोरी केली आणि घरातील सोने-चांदी व पैसे असा जवळ – जवळ ५० हजारांचा ऐवज चोरून नेला.
पंकज मिस्तरी हे आपल्या कुटुंबासह पारोळा येथील म्हसवे गावात आपल्या साडूकडे दारावर गेले असता रात्री तेथेच नातलगांनी आग्रह केल्याने मुक्काम राहिले आणि धरणगाव येथे मध्यरात्री त्यांच्याकडे चोरी झाली. तीन अज्ञात चोरटे मोटरसायकलवर आले आणि त्यांनी घराचे कुलूप तोडून घरात शिरकाव केला घरातील कपाट शोधून पंकज मिस्तरी यांचे मातोश्री मंगलाबाई मिस्तरी यांचे सोन्याचे मनीची माळ, मुलांच्या चैन, पत्नीच्या चांदीच्या साखळ्या व कष्टाने कमावलेले पैसे असे जवळ – जवळ पन्नास हजारांची चोरी करून ती चोरटे फरार झाले.
सकाळी पंकज मिस्तरी यांचे कारागीर शरद मोरे घरी आले असता त्यांना कडीकोंडा तुटलेला दिसले त्यांनी तात्काळ कॉलनी वासीयांना हाक दिली सर्व कॉलनीवासी एकत्र आले घरातील दरवाजा उघडा पाहून आश्चर्यचकित झाले. घरात पाहिले तर सगळे अस्त- व्यस्त कपाट व कपडे पडलेले होते चोरी झाली हे लक्षात येताच पंकज मिस्तरी यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला धाव घेऊन धरणगांव पोलीस स्टेशनला सदर बातमी कळवली.
कृष्ण गीता नगर येथे दरवर्षी अशा घटना या वाढत चालल्या आहेत. कधी मोटरसायकल चोरी, कधी पेट्रोल, तर कधी गाडीचे विविध पार्ट चोरीला गेले. कृष्णा गीता नगर येथे नगरवासी हे भयभयीत झाले आहेत. पोलीस प्रशासनाने तत्काळ या अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन गरीब कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी कॉलनी वासीयांकडून होत आहे.