आमदार देवेंद्र भुयार यांची विक्रमी गर्दीत वरूड येथे भव्य प्रचार रॅली !

235
Advertisements

▪️लाडक्या बहिणांचा लक्षणीय सहभाग, जोरदार शक्तीप्रदर्शन !

▪️आमदार देवेंद्र भुयार यांच्या रॅलीने विरोधकांचे धाबे दणाणले !

✒️वरूड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.18नोव्हेंबर):-विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रचारासाठी जनतेने वरूड येथील प्रचार सभा व भव्य रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात एकत्र होऊन विधानसभा मतदार संघात जोरदार शक्तिप्रदर्शन करीत संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला. यात लाडक्या बहिणांचा सहभाग लक्षणीय दिसून आला असून हजारो लाडक्या बहिणी आमदार देवेंद्र भुयार यांच्या पाठीशी खंबीर असून त्यांना निवडून आणण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

आमदार देवेंद्र भुयार यांची वरूड येथील प्रचार सभा रेकॉर्ड ब्रेक ठरली असून या सभेमुळे विरोधकांचे धाबे दणाणले असून संपूर्ण मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीमय वातावरण निर्माण झाले असून फुलांची उधळण करीत रस्त्या-रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या राहिलेल्या हजारो मतदारांना अभिवादन करीत त्यांचे स्वागत स्वीकारत आमदार देवेंद्र भुयार यांनी संपुर्ण मतदारसंघ पिंजून काढला.

वरूड येथील सभेला आमदार देवेंद्र भुयार संबोधित करतांना म्हणाले की, आपल्या मतदार संघामध्ये १० वर्ष आमदार असलेले डॉक्टर १ बेडचे रुग्णालय सुद्धा उभे करू शकले नाही. मात्र या तुमच्या लाडक्या भावाने मतदारसंघांमध्ये ३ वर्षात आरोग्य सुविधा बळकट केली. डॉक्टर हा देव असतो परंतु डॉक्टर अनिल बोंडे हा देव नसून एक राक्षसाच रूप आहे डॉक्टर अनिल बोंडे यांनी धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला मोर्शी वरूड मतदार संघामध्ये ना हिंदू खतरे मे है ना मुस्लिम धोके मे है धोके मे है तो इन गद्दारोकी खुर्चीया धोके मे है असे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी केले.

लाडकी वहिनी ही योजना माझ्या संकल्पनेतून अजितदादा पवार यांनी सुरू केली व त्या संदर्भ अभिनंदनाचा ठराव विधानभवनात घेण्यात आला मात्र या लाडक्या बहीण योजनेचे श्रेय कमळाबाई घेत आहे. मतदार संघातील नागरिकांनी विरोधकांच्या कुठल्याही भूलथापेला बळी न पडता आपण मला विकासावर मतदान मतदान करावे असे आवाहन केले.

चिनी अभिनेत्री अलका कुबल यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्या सारखे आमदार आत्ता गरजेचे आहेत कारण घराणे शाही नाही घरात कुठलाही राजकीय वारसा नाही एका शेतकरी कुटुंबातला मुलगा पण त्यात तळमळीने त्या तळागाळातल्या लोकांसाठी काम करण्याच्या भावनेने काम करतोय मी आमदार झालो म्हणून विसरले नाही लोकांना आजही तेवढ्या त्याने आपुलकीने भेटतात त्याच प्रेमाने भेटतात देवेंद्र दादा तुम्हाला जेवढ्या या माझ्या महिला जमल्या आहेत त्या महिलांना मी एवढेच सांगेल की यात तुमच्या भावाला तुम्ही एक एक प्रत्येकीचं मत घेऊन ओवाळणी घालायची आहे एवढंच माझ्या तळमळीचा आव्हाने तुम्हाला कोणी 20 तारखेला विसरायचं नाहीये आपली निशाणी एक घड्याळ एवढ्या लक्षात ठेवा असे आवाहन त्यांनी हजारोच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाला केले.