✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमुर(दि.12डिसेंबर):-आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमुर येथे संस्थापक स्व. प्राचार्य डॉ. चंदनसिंगजी रोटेले यांचे भान्सुली येथील समाधी स्थळी असलेला पुतळयाला हारार्पण व पुजन करून मौन अध्दांजली वाहुन व्दितीय पुण्यस्मरण कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी संस्था सचिव उदयसिंग ठाकुर उपस्थित होते. त्यानंतर प्राचार्य डॉ. शुभांगी लुंगे यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयाच्या सभागृहात स्व. डॉ. चंदनसिंगजी रोटेले यांचे प्रतिमेस हारार्पण व पुजन करून महाविद्यालयात मौन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर प्राचार्य डॉ. शुभांगी लुंगे यांच्या मार्गदर्शनात सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यासह उपजिल्हा रुग्णालय चिमुर येथील रुग्णांना तसेच राष्ट्रसंत तुकडोजी मुकबधीर विद्यालय वडाळा (पैकु) येथील विद्यार्थ्यांना फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.
याप्रसंगी डॉ. संजय पिठाडे, प्रा. हेमंत वरघने, डॉ. प्रिती दवे, डॉ. सुरेश मिलमिले, डॉ. सुदर्शन खापर्डे, डॉ. गजानन बन्सोड, डॉ. चंद्रभान खंगार, डॉ. मुरलीधर रेवतकर, डॉ. रागीणी मोटघरे, डॉ. विणा काकडे, प्रा. शिल्पा गणवीर, जोत्सना शिंगनजुडे, सुभाष शेषकर, दयाराम गावंडे, विलास इंगोले, सुधीर मसराम, मनीष जिचकार, धर्मसिंग वर्मा, अनिल मेश्राम, अमरसिंग डेकोले, पदमाकर डुकरे, दिपक गोपाले आदी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न झाला.