✒️सातारा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
सातारा(दि.13डिसेंबर):-श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण संचलित नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाने विद्यापीठ स्तरावर उज्वल यशाची परंपरा राखत शैक्षणिक वर्ष 2024- 25 या वर्षी सुद्धा चमकदार कामगिरी केली आहे. शंकरराव जगताप आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज वाघोली (ता. कोरेगाव) येथे बुधवार दिनांक 11/12/2024 रोजी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आंतर विभागीय कुस्ती स्पर्धा 2024 संपन्न झाल्या.
या विद्यापीठ स्तरीय स्पर्धेमध्ये नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयातील जयंत नितीन शेडगे बी. ए. भाग II याने (55 किलो गट) ग्रीको रोमन या कुस्ती प्रकारामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला तसेच गणेश महादेव सोडमिसे बी ए भाग I या विद्यार्थ्याने (खुला गट) फ्री स्टाइल कुस्ती प्रकारामध्ये द्वितीय तर शुभम बाळू निमगिरे बी ए भाग I याने (97 किलो गट) फ्री स्टाईल कुस्ती प्रकारामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला. यापैकी जयंत नितीन शेडगे या कुस्तीपटूची पंजाब येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मार्फत निवड झाली आहे.
क्रीडापट्टूंच्या या उज्वल यशाबद्दल श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा मा. श्रीमती सविता सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), मानद सचिव मा. डॉ. श्री. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) नियमाक मंडळाचे सदस्य मा. श्री. महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) तसेच संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय जाधव यांनी क्रीडापटूंना मौलिक मार्गदर्शन केले व प्राध्यापक वर्गाने क्रीडा विभागातील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या विद्यापीठ स्तरीय स्पर्धेसाठी सांगली, सातारा, कोल्हापूर येथील विभागीय स्पर्धेतील 180 विजेते क्रीडापटू विद्यार्थी स्पर्धक उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे क्रीडा अधिविभाग प्रमुख प्रा. डॉ. शरद बनसोडे तसेच क्रीडा विभागाचे अधिकारी पंच म्हणून तसेच महाराष्ट्र केसरी मा. श्री. पै. बापूसाहेब लोखंडे, मा. श्री. पै. धनाजी फडतरे, मा. श्री. पै. शिवाजी पाचपुते, मा. श्री. पै. गोरख सरक, मा. श्री. पै. चंद्रकांत सूळ इत्यादी मान्यवर कुस्तीपटू ही उपस्थित होते. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे क्रीडा संचालक तसेच प्राध्यापकही उपस्थित होते.