गडचिरोली श्रीगुरुदेव सेवा मंडळात कर्मयोगी श्रीतुकारामदादा गीताचार्य जयंती संपन्न

35
Advertisements

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.18डिसेंबर):-अ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळ गडचिरोली जिल्हा शाखेच्या वतीने मुख्य सामुदायिक प्रार्थना मंदिरात कर्मयोगी श्रीतुकारामदादा गीताचार्य यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक बंडोपंत बोढेकर होते. तर जिल्हा सचिव पंडित पुडके,आजीवन प्रचारक आत्माराम आंबोरकर, चरणदास बोरकुटे, रामनगर शाखेचे सुरेश मांडवगडे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विलास निंबोरकर, सायकल स्नेही मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा. विलासराव पारखी, प्रा. भास्कर नरूले , कवडू येरमे ,जीवनदास मडावी, नत्थुजी चिमूरकर आदींची उपस्थिती होती.

प्रास्ताविक पंडित पुडके यांनी केले तर आत्माराम आंबोरकर व सुरेश मांडवगडे, विलास निंबोरकर यांनी गीताचार्य तुकारामदादा यांच्या कार्यजीवनावर प्रकाश टाकला.

अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक-प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

याप्रसंगी बंडोपंत बोढेकर म्हणाले की, कर्मयोगी श्रीतुकारामदादा गीताचार्य यांचे त्यागी जीवन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचार प्रचारार्थ समर्पित होते. ग्रामसभा सक्षमीकरणासठी त्यांनी केलेले कार्य ऐतिहासिक असे आहे. त्यांच्या जीवनचरित्रापासून ग्रामातील कार्यकर्त्यांना सामाजिक कार्य करण्याची उर्जा मिळत असते, असे ते म्हणाले. यावेळी राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे वतीने देण्यात येणारा रा. जं. बोढेकर स्मृती सामाजिक सेवागौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते श्री.उपेंद्र रोहणकर यांना प्रदान करण्यात आला. सूत्रसंचालन तुषार निकुरे यांनी केले. सायंकाळी सामुदायिक प्रार्थनेनंतर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व उपस्थितांनी प्रार्थना आवारात असलेल्या राष्ट्रसंतांच्या समाधीचे दर्शन घेतले.