✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.25जानेवारी):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेच्या महामंडळातर्फे प्रतीवर्षी राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार देण्यात येतो.
यावर्षी राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकेतर पुरस्कारासाठी चांदा शिक्षण मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित गडचिरोली येथील वसंत विद्यालयाचे मुख्य लिपिक उदय बळीरामजी धकाते यांना प्रदान करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी शैक्षणिक क्षेत्राला हा प्रथमच मानाचा बहुमान उदय धकाते यांच्यारूपाने मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाचे ५२ वे राज्यस्तरीय अधिवेशन नुकतेच शहिद बालाजी सभागृह, चिमूर येथे संपन्न झाले. यावेळी पदवीधर आ. अभिजित वंजारी , महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने,सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर, कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर, उपाध्यक्ष प्रिया पवार,रविंद्र गवळी,उपाध्यक्ष,खैरुद्दीन सय्यद उपाध्यक्ष,उपाध्यक्षा सरीता कुलकर्णी,उपाध्यक्षा देविदास पंडागळे,डॉ. गोवर्धन पांडुळे,विभागीय कार्यवाह, मुंबई विभाग,गजानन नानचे,विभागीय कार्यवाह, कोल्हापुर विभाग,संजय कावळे,विभागीय कार्यवाह, संभाजीनगर विभाग,राजेश्वर चापुले,श्रीधर गोंधळी उपाध्यक्ष डी. पी. महाले,विभागीय कार्यवाह, नाशिक विभाग डॉ. विजय ताले,विभागीय कार्यवाह, लातुर
तसेच राज्य पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल गडचिरोली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर सेवक संघ चे जिल्हा अध्यक्ष अशोक काचिनवार, कार्याध्यक्ष संदीप भरणे, उपाध्यक्ष संघमित्रा वाळके, उपाध्यक्ष नंदलाल लाडे, शैलेश कापकर,कोषाध्यक्ष अभिजित शिवणकर, प्रमोद येलमुले, अरुण धोडरे,भूपेश वैरागडे,हेमंतरामटेके, बंडू शिवणकर,घनश्याम नैताम,
डोमळे,मडावी आदींनी अभिनंदन केले आहे.
उदय धकाते हे विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्थांशी जुळलेले असून ते राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद व सायकल स्नेही मंडळाचे सदस्य आहेत .