चंद्रपूर जिल्ह्यातील ५ व्या – कोरोना बाधिताचा मृत्यू

    60
    Advertisements

    ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चंद्रपूर(दि.11ऑगस्ट):-वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि.11ऑगस्ट रोजी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला. बल्लारपूर येथील ७० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचे आज कोरोनामुळे सकाळी ११ वाजता वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात निधन झाले. श्वसनाच्या गंभीर आजाराने ग्रस्त असणाऱ्या बालाजी वार्ड, बल्लारपूर येथील या नागरिकाला २ ऑगस्टला दाखल करण्यात आले होते. आल्यापासून त्यांची प्रकृती गंभीर होती.

    जिल्हयातील रहिवासी असणाऱ्या पैकी हा कोरोनामुळे झालेला पाचवा मृत्यू आहे. आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हयातील पाच वगळता अन्य दोन मृत्यूमध्ये तेलगांना राज्य व बुलडाणा जिल्हयातील प्रत्येकी एकाचा सहभाग आहे.
    आता पर्यत जिल्हयात ८९८ बाधिताची नोंद झाली आहे.