उपकेंद्र आरोग्य केंद्र परडा येथे वृक्षारोपण

    53
    Advertisements

    ✒️सचिन महाजन(वर्धा,प्रतिनिधी)

    मो:-9765486350

    वर्धा(दि.11ऑगस्ट):-नेहरू युवा केंद्र वर्धा च्या संयुक्त विद्यमाने परडा येथे समुद्रपूर तालुक्यातील स्वयंसेवक नितेश क महाकाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गंदगी मुक्त भारत अभियानांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ श्री सागर भोमले व आरोग्य सेविका झामरे मॅडम, सरपंच सौ सुवर्णाताई रा. तडस, मार्गदर्शक सचिव श्री किशोरजी जाधव साहेब यांनी वृक्षारोपण ही आजच्या काळाची गरज आहे. “वृक्ष वल्ली आम्हा सोयरे” या म्हणीचा अर्थ वृक्ष हे आपले मित्रापेक्षा ही श्रेष्ठ आहे आणि ते मानायला पाहिजे, कारण दिवसेंदिवस वातावरणात होत असलेले बदल व तापमानात वाढ होत आहे हे लक्षात घेऊन आज वृक्षारोपण करण्यात आले. उपसरपंच श्री बंडूजी मून,तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री नंदकिशोर म चंदनखेडे, पोलीस पाटील मॅडम सौ वंदनाताई मा. तडस तसेच नुतन संघर्ष युवा मंडळ परडा चे अध्यक्ष विक्की धोटे व सचिव धनराज नंदुरकर तसेच इ युवा मंडळाचे सदस्य व ग्रामपंचायत सदस्य विठ्ठलराव महाजन, श्री पांडुरंग मडावी, सौ. वनीताताई सु बुरीले, सौ सुरेखाताई धोटे, सौ संगीताताई वि घाटुलेँ, सौ वनीताताई ग पाल, सौ सारीकाताई घुमडे, आशा वर्कर सौ सारीकाताई चंदनखेडे, आरोग्य मदतनीस सौ करूणा शंभरकर, तसेच समुद्रपूर तालुक्यातील स्वयंसेवक नितेश क महाकाळकर व गावातील युवक मंडळी तसेच गावकरी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते.