?88 हजार 720 रुपयाचा मुद्देमाल जप्त
✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260
नांदेड(दि.25ऑगस्ट):-मरखेल पोलिस स्टेशन अंतर्गत देशी दारू हि अनेक गावांमध्ये चोरुन विक्री केली जात असल्यामुळे अनेक गरीबांच्या संसाराची राखरांगोळी होत असताना दिसते मात्र मरखेल पोलिस स्टेशन अंतर्गत असलेले अनेक गावांमध्ये अवैध देशी दारू गावठी दारु विक्रीला चाप बसलेला दिसून येते आहे गेल्या अनेक दिवसांपासून मरखेल पोलिस स्टेशनचे (सहाय्यक पोलीस निरीक्षक) आदित्य लोणीकर व (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक) अजित बिरादार यांच्या सततच्या होत असलेल्या दारू विक्रेत्यांवर धाडी, छापे यामुळे या विभागात दारु विक्रेत्याचे धाबे दणाणले आहेत गेल्या काही दिवसांपासून मानूर येथील तांड्यातिल गावठी दारुचा मोठा साठा जप्त केला व लोणी तांडा येथील झालेली मोठी कारवाई आणि दिनांक २५-८-२०२० रोजी मरखेल येथे अजित बिरादार ( स. पो.उपनिरीक्षक ) व त्यांच्या सोबत पो .काॅ. रवींद्र घुले आदिनी अचानक टाकलेल्या धाडीमध्ये अवैधरित्या विक्रीला ठेवलेल्या देशी दारू (भिंगरी) किमान ३६० बाॅटल जप्त करण्यात आले व आरोपी सचिन नारायण पप्पूलवार वय २१ रा. मरखेल यांच्या सह संपूर्ण मुद्देमाल अठ्ठयाऐशीं हजार सातशे विस रुपये चे माल जप्त करण्यात आले यापैकी ३६० बाॅटल प्रत्येकी ५२ असे अठरा हजार सातशे विस व एक अॅपे अटो ७०,००० रु असे मुद्देमाल जप्त करण्यात आले.