शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे तयार करण्याचे निर्देश

    53
    Advertisements

    ?खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश.

    ✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)
    मो:-8308862587

    सेनगाव(दि 27ऑगस्ट):-जिल्ह्यातील कळमनुरी, हिंगोली, सेनगाव, औंढा नागनाथ व वसमत तालुक्यात अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीपाचे मुग, उडीद, कापूस, सोयाबीन व हळद या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना तसेच सोयाबीन या पिकांची पाने पिवळी पडून हातचे पिक जात आहे, या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावी अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांना केली होती. या पत्राची तात्काळ दखल घेत हिंगोली जिल्हा अधिकारी यांनी महसूल विभाग, कृषी विभाग तसेच वन विभाग यांना नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.