Advertisements
✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)मो:-8308862587
सेनगाव(दि.27ऑगस्ट):-सहकार क्षेत्रात देदिप्यमान कामगिरी करणाऱ्या ‘गोदावरी अर्बन मल्टीस्टेट’ ने अत्यंत कमी कालावधीत एक हजार कोटी रुपयांचा ठेवींचा जादुई आकडा पार करत उत्तुंग भरारी घेतली आहे. यानिमित्ताने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत पाटील व अध्यक्ष राजश्री हेमंत पाटील यांनी व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. गणेशोत्सवामध्ये गौरी पूजनाच्या पूर्वसंध्येला ‘गोदावरी अर्बन’ ने हे यशाचे शिखर गाठले आहे.संस्थेवर विश्वास ठेवून आम्हाला सहकार्य करणाऱ्या सर्व सभासद, ठेवीदार, ग्राहक यांचे आभार संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती राजश्री हेमंत पाटील यांनी केले आहे.