✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)
मो:-8080942185
केज(दि.28ऑगस्ट):-वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या राज्यकारिणी ने वंचित बहुजन आघाडी चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार मराठवाडा प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणित पक्षातील मराठवाडा प्रदेशात काम करणार्या दिग्गजांना स्थान देऊन काम करण्याची संधी देण्यात आली आहे.
मराठवाडा प्रदेश कार्यकारिणी अध्यक्षपदी मराठा क्रांति मोर्चा बीड जिल्हा समन्वयक तथा वंचित बहुजन आघाडी बीड चे विधानसभा उमेदवार मा. अशोकजी हिंगे यांची निवड करण्यात आली . उपाध्यक्षपदी नांदेडचे केशवजी मुद्देवाड , हिंगोली चे मुनिर पटेल, उस्मानाबाद चे प्रविण रणबागुल,जालना चे डाॅ.अशोक खरातव दिपक डोके यांची निवड करण्यात आली तसेच मराठवाडा महासचिव म्हणून लातूर जिल्ह्यातील भारिपचे नेते संतोषभाऊ सुर्यवंशी व रमेश गायकवाड यांची तर मुख्यसंघटकपदी लातुर विधानसभा उमेदवार राजा मणियार तर परभणी चे मराठवाडा प्रवक्तेपदी डॉ.धर्मराज चव्हाण , औरंगाबाद जिल्ह्यातील मराठवाडा प्रदेश कार्यक्रम प्रमुख जितेंद्र शिरसाठ, मराठवाडा प्रदेश प्रशिक्षण विभाग प्रमुख म्हणून परभणी जिल्ह्यातील डॉ.सुरेश शेळके तर सदस्य म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील भैय्यासाहेब नागटिळे व नांदेड जिल्ह्यातील डॉ.संघरत्न कुर्हे यांची निवड करण्यात आली आहे असे वंचित बहुजन आघाडी च्या राज्यकोअर कमिटी व निवड समितीने प्रसिद्धिस दिलेल्या नियुक्ती पत्रकाद्वारे कळविले आहे.