✒️पंढरपूर (पुरोगामी संदेश नेटवर्क)
पंढरपूर(दि.31ऑगस्ट):-श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यासाठीआज दिनांक. ३१ऑगस्ट रोजी पंढरपूर वंचित बहुजन आघाडी व वारकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे .या पार्श्वभूमीवर मंदिराकडे जाणारी रस्ते पोलिसांनी बॅरिकेट्स लावून बंद केले आहेत ,यामुळे मंदिर परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे वंचित बहुजन आघाडीचे ऍड प्रकाश आंबेडकर हे आंदोलनात सहभागी झाले.
असून येथे हजारो संख्येने लोकांची गर्दी आहे त्यांनी एक लाख भाविकांच्या उपस्थितीत आंदोलन करण्याचे आवाहन केले होते मात्र प्रत्यक्षात एक हजाराच्या आसपास भाविक विशेषत वंचित चे कार्यकर्ते उपस्थित आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे त्रिस्तरीय बंदोबस्त असून ४५० पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात आहेत. मंदिर परिसर सील केला आहे. आंदोलकांना पोलिसांनी शिवाजी चौक येथे अडवले आहे.
(दुपारी 2.30 वाजताचे वृत्त)