Home चंद्रपूर भरधाव ट्रॅक्टरने चिरडले विद्यार्थ्यांना, यश आय सी यू मध्ये तर रोनक जखमी

भरधाव ट्रॅक्टरने चिरडले विद्यार्थ्यांना, यश आय सी यू मध्ये तर रोनक जखमी

1381

🔺भरधाव ट्रॅक्टराना ‘ नो ब्रेक नो रूल्स ‘

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.26जानेवारी):- तालुक्यातील अर्हेर – नवरगाव येथील दोन विद्यार्थी प्रजासत्ताक दिनानिमित्त ब्रम्हपुरीला शाळेत जात असताना भरधाव ट्रॅक्टरने जबर धडक दिली. यात भरधाव ट्रॅक्टरने दोन विद्यार्थ्यांना चिरडले त्यातील यश आय सी यू मध्ये तर रोनक जखमी अवस्थेत आहे.

सविस्तर माहितीनुसार यश प्रकाश मेश्राम(15) वर्ग नववी अर्हेर – नवरगाव, आणि रोनक राजू नागपुरे (15) भालेश्वर हे दोघे नेवजाबाई हितकारनी( मुले) शाळेत शिक्षण घेत होते. प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एन. सी. सी. युनिफॉर्म घालून शाळेत जात होते. परंतु ‘ नो ब्रेक नो रूल्स ‘ अशा भरधाव ट्रॅक्टरने विध्यार्थ्यांचा अपघात केला. कर्तव्यावर असलेले अर्हेर – नवरगाव येथील ग्रामविकास अधिकारी रतीराम चौधरी यांनी ऍम्ब्युलन्स आणि पोलीसांना माहिती देवून अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना दवाखान्यात हलवीण्यात आले. अर्हेर – नवरगाव वरून भरधाव धावणाऱ्या अवैद्य रेती तस्कर ट्रॅक्टरवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

———————————————

ड्राइवरला ताब्यात घेण्यात आले. प्रशासनाकडून अतीवेग वाहनावर रोजच्या सात ते आठ 281, 285 नुसार कारवाया केल्या जातात. अपघात करणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई केल्या जाईल. परंतु पालकांनीसुद्धा प्रशासनाला को – ऑपरेट करावे कमी वयाच्या पाल्याना वाहने देऊ नये.

-प्रमोद बाणबले, पोलीस निरीक्षक, ब्रम्हपुरी

———————————————

गावातून धावणाऱ्या अवैध्य रेती ट्रॅक्टराच्या अतिवेगावर प्रतिबंध लावू. कमी वेगात वाहने चालवीण्याचे माहितीपर पोस्टर गावात लावू. यावर काही बदल न झाल्यास ग्रामपंचायत मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार करू. 

-रतीराम चौधरी, ग्रामपंचायत, अर्हेर – नवरगाव