Home चंद्रपूर ओबीसी बहुजन महासंघाची सडक अर्जुनी तालुका बैठक ; अभय वसंतराव फुले सर...

ओबीसी बहुजन महासंघाची सडक अर्जुनी तालुका बैठक ; अभय वसंतराव फुले सर यांची तालुका अध्यक्षपदी निवड

17

✒️गोंदिया(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

गोंदिया(दि.5मे):-अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाच्या संघटनात्मक विस्ताराला अधिक गती देत, संघटनेला तळागाळापर्यंत मजबूत करण्याच्या उद्देशाने जिल्हा व तालुका स्तरावर महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आले आहेत. या अनुषंगाने दि. 30 एप्रिल 2026 रोजी सडक अर्जुनी तालुका येथील संघटनेच्या कार्यालयात एक भव्य व विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा भंडारा लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार मा. डॉ. खुशालचंद्र बोपचे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि संघटनात्मक बांधिलकी दृढ करणारा ठरला.

या वेळी सडक अर्जुनी येथील ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते श्री. अभय वसंतराव फुले सर यांची सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष पदावर अधिकृतपणे निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे स्थानिक पातळीवर आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

कार्यक्रमाला राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. गणेशभाऊ पारधी, गोंदिया जिल्हाध्यक्ष व्यास नारायण व्ही.टी. पटले सर, जिल्हा उपाध्यक्ष दत्तराज जी गौतम, महासंघ प्रवक्ता भाऊदास जी जांभुळकर सर, तसेच तुलसीदास जी राऊत, सय्यद अहेमद जी, श्रीमती लोफा गजभिये, विद्या ताई फुले, देवांगना आर. फुले, अविनाश जी खोब्रागडे, कैलास जी भियटे, सिद्धार्थ उडीरवाडे, बिसेन सर यांसह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

या सर्व मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आणि पुढील काळात संघटनेच्या कार्याला अधिक वेग देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या निवडीमुळे ओबीसी बहुजन समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समाजातील वंचित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी तसेच महासंघाच्या ध्येय-धोरणांना प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी हे नवीन नेतृत्व निश्चितच सक्षम ठरेल, असा विश्वास मा. डॉ. बोपचे यांनी व्यक्त केला.