

✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.25मे):-राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पुढाकारातून दिनांक 24 मे 2026 स्व दादासाहेब कन्नमवार सभागृह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर येथे ओबीसी, विजा भज विमाप्र , अनुसूचीत जाती आणि जमाती यांची सयुक्तिक रित्या बैठक 24 मे 2026 ला जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर येथे सहविचार बैठक सपन्न झाली.
ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी आणि वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेस बसण्याची संधीची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होणार असून अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागेवर दावा सांगता येणार नाही, असा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. फक्त स्थगिती दिली असली तरी रद्द झालेला नाही आहे. सरकारने विधी व न्यायालयाकडे मत मागविले आहे हा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा या साठी सहविचार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी ठराव मांडत सर्वानुमते रविवार दिनांक 28 जून 2026 ला चंद्रपूर येथे महामोर्चा ठराव मांडला आणि जो पर्यंत जनगणना आयुक्त ओबीसींची जातिनिहाय जनगणना साठी भारत सरकारचे राजपत्र काढत नाही तो पर्यंत जनगणना साठी असहकार करण्याचे आवाहन राजुरकर यांनी केले.
या वेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सुद्धा जो पर्यंत ओबीसींचा कॉलम येत नाही तो लढा सुरूच राहणार आणि बहुजन समाजावर अन्याय करणारा 14 मे चा निर्णय राज्य सरकारने त्वरित रद्द करावा असे म्हटले, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, भविष्यात अशीच एकजूट बहुजन समाजात रहावे , महानगर पालिकेचे उपाध्यक्ष प्रशांत दानव, स्थायी समितीचे अध्यक्ष सौ मनस्वी संदीप गीऱ्हे, विरोधी पक्षनेता राजेश अडुर, जनविकास सेनेचे पप्पू देशमुख, आदिवासी विकास परिषदेचे प्रमोद बोरीकर, केशव तीराणीक, ऍड दत्ताभाऊ हजारे, धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष श्रीधर मालेकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रा शेषराव येलेकर, जयदीप रोडे, निलेश नन्नावरे तसेच महानगर पालिकेचे नगर सेवक वसंता देशमुख, आकाश साखरकर, भालचंद्र दानव, अभिषेक डोईफोडे, रामनरेश यादव, राहुल चौधरी, नगरसेविका सौ सुनंदा धोबे, सौ.मनीषा बोबडे, सौ श्वेता लांडगे, भावना बावनकर तथा ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे, सतीश भिवगडे, प्रशांत काळे, सुधाकर काकडे, सूर्यकांत खनके, प्रा अनिल शिंदे, मुन्ना आवळे, प्रा बबनराव राजुरकर, देवराव दिवसे , मोरेश्वर सूरकर, शंकर पाल, हरिश्चंद्र गौरकर, प्रभाकर गेडाम, बालू सातपुते, डॉ विजय हेलवेते, प्रा रवी झाडे, शाम राजुरकर, नरेन गेडाम, गणेश आवारी, तुळशीराम देरकर, संतोष बांदुरकर, अरविंद मडावी, दत्तू कडुकर , मुबारक शेख ओबीसी, विजा , भज आणि विमाप्र अनुसूचीत जाती , जमाती समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन कृष्णा मेश्राम तर आभार रामदास कामडी यांनी केले.







