Home महाराष्ट्र भिमथडी साहित्य संमेलनात संगीतकार शिवराज साने यांना प्रशिस्तपत्र देऊन सन्मान

भिमथडी साहित्य संमेलनात संगीतकार शिवराज साने यांना प्रशिस्तपत्र देऊन सन्मान

26

✒️दौंड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

दौंड(दि.25मे):-बोरमलनाथ मंदिर येथे आयोजित भिमथडी साहित्य संमेलनात संगीतकार शिवराज साने यांना प्रशिस्तपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

दौंड तालुक्याचे आमदार अँड. राहुल दादा कुल कार्यक्रमाला उपस्थित होते. साहित्य संमेलनात संगीतकार शिवराज साने यांना सुरज पवार यांच्या हस्ते हे प्रशिस्तपत्र देण्यात आले. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ साहित्यिक सुरज पवार यांची निवड करण्यात आली. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलन सोहळा पार पडला.

शिवराज साने यांनी संगीत क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल व त्यांच्या कार्याचा गुणगौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आला. संमेलनाचे आयोजन जेष्ठ साहित्यिक श्री दशरथ यादव, संदेश सोनवणे, दिपक पवार यांनी केले होते. तसेच सैराट फेम अभिनेता प्रिन्स, प्रा. फ. शिंदे, जेष्ठ कवयित्री सुवर्णा वाघमारे सुप्रसिद्ध कवी प्रा सुरेश वाळेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ स्वाती बंगळे, आभार प्रदर्शन जेष्ठ कवयित्री सौ. सूवर्णा वाघमारे यांनी केले.