

▪️भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दला तर्फे 32 वा नामविस्तार दिनअभिवादन सभा व शहिदाना मानवंदना
✒️संभाजीनगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
संभाजीनगर(दि.18जानेवारी):-डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठास द्यावे यासाठी जनार्दन मेवाडे, पोचीराम कांबळे, गौतम वाघमारे, सुहासिनी बनसोडे, चंदर कांबळे, नारायण गायकवाड, शरद पाटोळे, रोशन बोरकर, प्रतिभा तायडे,दिलीप रामटेके, गोविंद भुरेवार हे आंबेडकरवादी 11 जन शहीद झाले त्यांना विनम्र अभिवादन करत असून अशी बाबासाहेब यांचे नावासाठी निष्ठा जगाच्या पाठीवर केवळ मराठवाड्यातच आहे, त्यामुळे येथे आले की आम्हाला ऊर्जा मिळते असे सांगून आपण भीमा कोरेगावच्या युद्धामध्ये जसे 28 हजार पेशव्यांना 500 महारांनी हरविले व आपल्या पूर्वजांच्या गळ्यातील विषमतेचे, गुलामीचे गळ्यातील मडके व पाठीचा खराटा निघाला आहे. त्यामुळे समाजात तुझ्यासारखे 56 (28000÷500=56) बघितलेत असे बोलतात त्यांचे आपण वारसदार आहोत असे प्रतिपादन भारतीय बौद्ध सभेचे ट्रस्टी राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर ॲड एस के भंडारे यांनी भारतीय बौद्ध महासभा महानगर जिल्हा शाखा छ. संभाजी नगर तर्फे विद्यापीठ नामविस्तार चा 32 वा वर्धापन दिन व शहिदांना मानवंदना , डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, नागसेन वन च्या प्रांगणात आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.
ॲड एस के भंडारे पुढे म्हणाले की, समानतेचे विरोधक व विषमतेचे समर्थक असलेले लोक केंद्रात, राज्यात, स्थानिक पातळीवर विविध ठिकाणी बसले आहेत, त्यांना आपणास संविधानाने दिलेले समतेचे,शिक्षणाचे, नोकरीचे अधिकार नको आहेत,
काहीजण संविधान बदलण्याची भाषा करतात त्यामुळे संविधान समर्थकांना घेऊन त्यांना मतदानाच्या माध्यमातून सत्तेवर येऊ देऊ नका,







