

✒️अहिल्यानगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर(दि.27जानेवारी):-शब्दगंधच्या माध्यमातून नवोदित लेखक कवींना संधी मिळत आहे, साहित्यिक कार्यक्रमाचे सातत्य त्यांनी राखले असून आम्हालाही त्यापासून प्रेरणा मिळत आहे, शब्दगंध हा एक परिवार असून या परिवाराने सत्कार केल्याने मी भारावून गेलो आहे,* असे प्रतिपादन अहिल्यानगर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपतदादा बारस्कर यांनी केले.
शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, ज्ञानदेव पांडुळे, प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे, संस्थापक सुनील गोसावी, राजेंद्र चोभें,डॉ.अनिल गर्जे, भारत गाडेकर, प्रा. डॉ. अशोक कानडे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याबद्दल संपतदादा बारस्कर यांचा शब्दगंध च्या वतीने अध्यक्ष राजेंद्र उदागे व ज्ञानदेव पांडुळे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना संपतदादा बारस्कर म्हणाले की, आमच्या प्रभागातील सर्वच नागरिकांनी आमच्यावर प्रेमाचा मतरूपाने वर्षाव केला असून उतराई होण्यासाठी परिसरातील नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल,अहिल्यानगर शहर आमदार संग्रामभैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोत्कृष्ट होण्यासाठी प्रयत्न केले जातील. शब्दगंध च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमास सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील गोसावी यांनी केले तर राजेंद्र चोभे पाटील, बबनराव गिरी व ज्ञानदेव पांडुळे यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी शब्दगंध चे पदाधिकारी डॉ अशोक ढगे, प्रा डॉ किशोर धनवटे , नेवासा,अशोक दौंड, प्रा आशा पालवे,पाथर्डी, शर्मिला रणधीर, राहुरी, बाळासाहेब शेदूरकर,आष्टी, सुरेखा घोलप केडगाव, शर्मिला गोसावी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शेवटी प्रा.डॉ. अशोक कानडे यांनी सर्वांचे आभार मानले.







