

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.4फेब्रुवारी):- बुद्ध विहारे चळवळीची केंद्रे व्हावीत या उद्देश्याने वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानने चक्रवर्ती सम्राट अशोक आदर्श बुध्दविहार स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ अलिकडेच मिलन सभागृह चिमूर येथे नगराध्यक्ष गीता लिंगायत, पारशिवनीचे नगराध्यक्ष दीपक शिवणकर,वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूपेश पाटील, डॉ. सीमा पाटील,राहुल घुगे,पराग अंबादे यांचे उपस्थितीत संपन्न झाला.या स्पर्धेत नेरी येथील दीपंकर बुद्ध विहाराने प्रथम क्रमांक पटकावला.संगणक संच, २२ प्रतिज्ञा फलक आणि सन्मानपत्र देऊन अतिथीच्या हस्ते दीपंकर बुद्ध विहाराला सन्मानित करण्यात आले.
दीपंकर बुद्ध विहारात वाचनालय, विद्यार्थ्यांकरिता विविध स्पर्धाचे आयोजन, महापुरुषांच्या जीवनावर कार्यक्रम आदी उपक्रम सर्वांच्या साथीने घेतली जातात.मूल्यांकन समितीने २० निकषांच्या माध्यमातून सर्व बुद्ध विहारांचे मूल्यांकन केले. या निकषात नेरी येथील दीपंकर बुद्ध विहार प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. दीपंकर बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष विनोद पेटकर आणि सर्व पदाधिकारी,सदस्य, नागरिकांच्या प्रयत्नामुळे विहाराला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.
पारितोषिक वितरण समारंभाला दीपंकर बुद्ध विहार समितीचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.पारितोषिक वितरण समारंभाचे संचालन वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे सचिव सुरेश डांगे यांनी केले.आभारप्रदर्शन रामदास कामडी यांनी केले.







