

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)
भंडारा(दि.9फेब्रुवारी):- पवनी तालुक्यातील यशोधरा बहुउद्देशीय महिला मंडळ वासेळा च्या वतीने पंचशील बौद्ध विहार येथे त्याग मूर्ती माता रमाई यांची 128 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी त्याग मूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केल्यानंतर अभिवादन करण्यात आले. त्यांच्या जयंती निमित्त केक कापण्यात आले.
यावेळी सुरेखा उके, जीवनकला सुखदेवे, मंदा रामटेके, रेखा सुखदेवे ,कविता गोस्वामी, फुलकन्या रामटेके, पुनम शेंडे ,ललिता मोटघरे, सविता गोस्वामी, लंकन खोब्रागडे,कल्पना गजभिये ,अशोक मेश्राम, अशोक रामटेके, प्रामुख्याने उपस्थित होते.







