Home चंद्रपूर नगर पंचायतीच्या कारवाईनंतर व्यापाऱ्यांचे भवितव्य टांगणीला- ‘दुकान गाळे लवकरात लवकर उपलब्ध करून...

नगर पंचायतीच्या कारवाईनंतर व्यापाऱ्यांचे भवितव्य टांगणीला- ‘दुकान गाळे लवकरात लवकर उपलब्ध करून द्या’:अतिक्रमणधारक व्यापाऱ्यांची मागणी

383

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

भिसी(दि.16फेब्रुवारी):- भिसी नगर पंचायतीने राबवलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेत वर्षानुवर्षांची दुकान लाईन जमीनदोस्त केल्यानंतर, आता येथील विस्थापित व्यापाऱ्यांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. “आमचे संसार रस्त्यावर आले आहेत, प्रशासनाने आम्हाला लवकरात लवकर पर्यायी दुकान गाळे उपलब्ध करून द्यावेत,” अशी आर्त हाक या व्यापाऱ्यांनी दिली आहे.

या आशयाचे निवेदन भिसी व्यापारी असोशिएशन व्दारे नगर पंचायत ला देण्यात आले.

 २८ फेब्रुवारी २०२५ ला नगर प्रशासनाने गावातील मुख्य मार्गावर होणारी वाहतुकीच्या कोंडीचा मुद्दा पुढे करत मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली होती. यामध्ये शंभरावर व्यापाऱ्यांची दुकाने पाडण्यात आली. ही दुकाने अनेक दशकांपासून त्या ठिकाणी होती. प्रशासनाच्या या कारवाईमुळे शहराचा रस्ता जरी मोकळा झाला नसला, तरी त्यावर अवलंबून असणाऱ्या शेकडो कुटुंबांची रोजीरोटी मात्र बंद झाली आहे.

​मागील वर्षभरात बाधित व्यापाऱ्यांनी अनेकदा नगर प्रशासनाला निवेदन देऊन ज्या व्यापाऱ्यांची दुकाने पाडण्यात आली आहेत, त्यांचे तातडीने पुनर्वसन करून नवीन गाळे देण्यात यावेत अशी मागणी केली परंतु एक वर्षांपासुन बाधित व्यापाऱ्यांना फक्त आश्वासनच देण्यात आले.

नुकतेच भिसी येथील व्यापारी बांधवांनी भिसी व्यापारी असोशिएशन ची नवीन कार्यकारीणी गठीत केली. भिसी व्यापारी असोशिएशन च्या माध्यमाने येथील बाधीत व्यापारी बांधवांनी एकत्र येत नगर पंचायतीला निवेदन दिले असून खालील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत यामध्ये ज्या व्यापाऱ्यांची दुकाने पाडण्यात आली आहेत, त्यांचे तातडीने पुनर्वसन करून नवीन गाळे देण्यात यावेत, तात्पुरत्या स्वरूपात व्यवसाय करण्यासाठी हॉकर्स झोन किंवा विशिष्ट जागा नेमून द्यावी, नगर पंचायतीने बांधलेल्या किंवा प्रस्तावित असलेल्या व्यापारी संकुलात बाधित व्यापाऱ्यांना प्राधान्याने जागा मिळावी. अचानक झालेल्या कारवाईमुळे मालाचे मोठे नुकसान झाले 

 आहे, त्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा अशा मागणीचे निवेदन भिसी व्यापारी असोशिएशन मार्फत

नगर पचायत ला देण्यात आले. भिसी चे नगराध्यक्ष अतुल पारवे, उपाध्यक्ष किशोर मुंगले यांनी निवेदन स्विकारले. निवेदन देतेवेळी भिसी व्यापारी असोशिएशन चे अध्यक्ष पंकज मिश्रा,सचीव नरेश मुंगले, उपाध्यक्ष अनिल शेन्डे, सुरेन्द्र घरत, नगर सेवक महेश रामटेके,जगत तांबे, मनोज सातपूते,आनंद कचोलीया, बंडू मेश्राम, अनील लोहकरे, प्रकाश ठोंबरे, राकेश शिकरकर,प्रमोद मोहीनकर व अनेक व्यापारी बांधव उपस्थीत होते.

…………………………………………

​ “शहराचा विकास आणि रस्ते रुंदीकरणासाठी ही कारवाई अनिवार्य होती. पात्र व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी शासन स्तरावर धोरण ठरवले जाईल आणि नवीन व्यापारी संकुलाचे नियोजन सुरू आहे.”

अतुल पारवे, नगराध्यक्ष.

…………………………………………

 मागील अनेक दशकांपासून आम्ही त्या ठिकानी व्यवसाय करीत आहोत व शासनाला भोगवटा कर

व्यवसाय कर, जिएसटी सारखे कर सुद्धा भरत आहोत. आमचे कुटुंब या व्यवसायावर चालते. व्यवसायाच्या आधारे अनेक व्यापारी बांधवांनी लाखों रूपयाचे कर्ज घेतले आहे. आज त्या कर्जाचे हफ्ते भरने मुश्कील झाले आहे. प्रशासनाने आम्हाला लवकरात लवकर गाळे बांधून देवून आम्हाला जगण्याचा आधार द्यावा. 

पंकज मिश्रा, अध्यक्ष.

भिसी व्यापारी असोशिएशन,भिसी.