Home महाराष्ट्र खटाव गटात ७३.८१ % मतदान: खटाव पं समिती गणात ७५.४३ % तर...

खटाव गटात ७३.८१ % मतदान: खटाव पं समिती गणात ७५.४३ % तर पुसेगाव पं. समिती गणात ७२.१० % मतदान

109

✒️खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)

सातारा(दि.7फेब्रुवारी):-हायहोल्टेज खटाव जिल्हा परिषद गटात चुरशीने मतदान पार पडले. खटाव जिल्हा परिषद गटात ७३.८१ % मतदारांनी मतदान केले. खटाव पंचायत समिती गणात ७५.४३ % तर पुसेगाव पंचायत समिती गणात ७२.१० % मतदारांनी मतदान करत उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद केले.

      खटाव जिल्हा परिषद गटावर सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. खटाव जिल्हा परिषद गट आणि खटाव पंचायत समिती गणात ‘ओपन’ आरक्षण होते. त्यामध्ये भाजप-शिवसेना (शिंदे) गटाकडून आ. महेश शिंदे यांच्या पत्नी डॉ. प्रिया शिंदे तर राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून राहुल पाटील अशी दुरंगी ‘हेवीवेट’ लढत होत आहे. तर खटाव पंचायत समिती गणात भाजप-शिवसेने कडून शशिकांत रोमन, राष्ट्रवादी काँग्रेस कडून मुगूटराव पवार, शिवसेना (उबाठा) मधून अमिन आगा रिंगणात आहेत. तर पुसेगाव पंचायत समिती गणात ओबीसी महिला आरक्षण होते. या गणात भाजप-शिवसेने कडून मिनाक्षी वलेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून स्नेहल जाधव रिंगणात आहेत.

    खटाव जिल्हा परिषद गटात एकूण ३४७७७ मतदार आहेत. त्यामध्ये खटाव पंचायत समिती गणात १७८७६ पैकी १३४८५ तर पुसेगाव पंचायत समिती गणात १६९०१ पैकी १२१८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ३४७७७ पैकी २५६७१ मतदारांनी आपला कौल दिला आहे.