

▪️”बौद्धिक परिश्रमातून विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे.” – कीर्तीताई गवई (अर्जुन)
✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमरावती(दि.11फेब्रुवारी):- ” आज स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी बौद्धिक परिश्रम करून यश संपादन केले पाहिजे म्हणजे त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल यात शंका नाही.यासाठी थोर पुरुषांच्या विद्यार्थी जीवनाचा अभ्यास करून त्यातून अभ्यास विषयक प्रेरणा घेऊन तशा प्रकारचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केल्यास तो विद्यार्थी जीवनात यशाचे शिखर गाठू शकतो.वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेकरिता हार्दिक शुभेच्छा.”असे विचार दहावीचा निरोप समारंभाच्या व ” परीक्षेला जाता जाता ” या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून कीर्तीताई गवई (अर्जुन) यांनी व्यक्त केले.
त्या श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय,फ्रेजरपुरा, अमरावती येथे दि.९ फेब्रुवारी २०२६ रोजी वर्ग दहावीच्या निरोप समारंभाच्या विद्यार्थीप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी सादर केलेल्या ” परीक्षेला जाता जाता ” या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून विचार व्यक्त करीत होत्या.
निरोप समारंभ व “परीक्षेला जागा जाता” या कार्यक्रमाच्या अध्यक्षा कीर्तीताई गवई (अर्जुन) (अध्यक्ष श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट, अमरावती),प्रमुख अतिथी प्रा.डॉ.कमलाकर पायस, विद्यार्थी प्रबोधनकर्ते प्रा.अरुण बुंदेले, मुख्याध्यापक श्री प्रवीण घोंगडे, श्री राठोड सर, श्री मातने सर होते.
अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माजी राज्यपाल दादासाहेब गवई यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
सर्वप्रथम प्रा.अरुण बुंदेले यांनी ” कॉपीमुक्त अभियान ” हे स्वरचित वऱ्हाडी काव्यगीत गाऊन सर्वांची मनं जिंकली .
” अभ्यास करताना मनाचे केंद्रीकरण आवश्यक “
– प्रा.अरुण बुंदेले
” परीक्षेला जाताना लक्षात ठेवावयाच्या सूचना लहान असतात परंतु गुणवृद्धीच्या दृष्टीने त्या महान असतात,म्हणून विद्यार्थ्यांनी त्या सूचनांचे आचरण केले पाहिजे. परीक्षेच्या वेळापत्रकानुसार नियमित अभ्यासाचे वेळापत्रक तयार करून अभ्यास करणे आणि अभ्यास करताना प्रश्नांची उत्तरे दीर्घकाळ लक्षात राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मनाचे केंद्रीकरण करणे आवश्यक आहे.” असे विचार प्रा.अरुण बुंदेले यांनी” परीक्षेला जाता जाता ” हा स्वनिर्मित कार्यक्रम सादर करताना दहावीच्या निरोप समारंभात व्यक्त केले.
विद्यार्थीप्रबोधनकर्ते प्रा. अरुण बुंदेले यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि “परीक्षेला जाता जाता” या कार्यक्रमात आदर्श उत्तरपत्रिका सोडविणें एक कला,पेपरच्या पूर्वरात्री वस्तुंची यादी,पेपरच्या दिवशी शांत चित्त आवश्यक,परीक्षा हॉलमध्ये प्रवेश केव्हा?,पेपरच्या पूर्वरात्री झोप किती?,पाण्याच्या बॉटलचे महत्त्व,
वेळेची विभागणी,परीक्षा हॉलमधील वर्तन,हुशार विद्यार्थ्यांना भान आवश्यक,बारकोड व होलोक्रॉफ्ट स्टिकर्स,कॉपीचा निषेध, प्राविण्याचे गुपीत अशा पंचवीस मुद्द्यांचे विवेचन प्रासादिक भाषेत करून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची प्रेरणा निर्माण केली.
याप्रसंगी श्री मातने सर,श्री राठोड सर तसेच वर्ग 10 ची कु.राधिका मंडले,कु.अश्मिरा चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचलन व प्रबोधनकर्ते प्रा.अरुण बुंदेले यांचा परिचय वर्ग ९ ची कु.तेजस्विनी माने .यांनी तर आभार प्रदर्शन वर्ग ९ ची कु.स्वरांजली रोडगेने केले.
कार्यक्रमाला सर्वटकर मॅडम,श्री शेंडे सर,गावंडे सर, कुबडे मॅडम,गवई सर,राठोड सर,सोळंके सर,मातने सर तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.कार्यक्रमाची सांगता अल्पपहारने झाली.







