

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.13फेब्रुवारी):-येथे स्वामी विवेकानंद अकॅडमीचे संचालक प्रा.विठ्ठल कांगणे यांनी गंगाखेड शहरातील रुद्राक्ष इंग्लिश स्कूलला (दि.११ फेब्रुवारी बुधवार) रोजी भेट देत लहान मुलांच्या शिक्षणाबाबत मार्गदर्शन केले.नर्सरी ते तिसरीपर्यंत शिक्षण देणाऱ्या या शाळेच्या दोन्ही शाखांना दत्त मंदिर परिसर व कोद्री रोड त्यांनी विशेष भेट दिली लहान मुलांचे शिक्षण हे केवळ पाठांतरापुरते मर्यादित न राहता त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असावे असे प्रतिपादन प्रा.कांगणे यांनी यावेळी केले.
चिमुकल्या विद्यार्थ्यांना हसत-खेळत,आनंदी आणि सकारात्मक वातावरणात शिक्षण दिल्यास त्यांच्या बौद्धिक व मानसिक विकासाला चालना मिळते असे त्यांनी सांगितले. बालवयातील विद्यार्थ्यांना ज्ञान देताना त्यांच्या वयाची गरज, मानसिकता आणि उत्सुकता लक्षात घेऊन अध्यापन पद्धती अवलंबावी यावर त्यांनी विशेष भर दिला.
प्रा.कांगणे यांच्या भेटीप्रसंगी त्यांचा सत्कार रुद्राक्ष इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष नामदेव मुंडे,संचालक धनराज मुंडे,महादेव केंद्रे,मुख्याध्यापिका सुनीता फड,संस्थेचे महारुद्र मुंडे, समाजसेवक अर्जुन लटपटे, लोकनेते गोपीनाथ मुंडे स्कूलचे संचालक लहू घरजाळे,लटपटे,संचालक रवींद्र जाधव,विलास राठोड,मंचक मुंढे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.







