

✒️नांदेड(पुरोगामी न्यूज नेटवर्क )
नांदेड(दि.20फेब्रुवारी):- पुरुष हक्क समितिचे २८ वे राष्ट्रीय अधिवेशन २२ फेब्रुवारी २०२६ ला स.११:०० ते सायं. ५:०० पर्यंत नरहर कुरुंदकर सभागृह, पीपल्स काॅलेज,स्नेह नगर नांदेड येथे प्रमुख पाहुणे जेष्ठ विधिज्ञ एड. शैलेश देशमुख, तसेच नांदेड़चे आमदार बालाजीराव कल्याणकर, आनंदराव बोंडारकर, जिल्हा सरकारी अधिवक्ता एड. रणजीत देशमुख यांच्या उपस्थितीत दिप प्रज्वललाने होणार आहे.
अधिवेशन चार सत्रात होत असुन पहिले सत्र प्रमुख पाहुण्यांचा परिचय तसेच कायदेशीर परिप्रेक्ष्य यात विद्यमान कौटुंबिक कायद्यांचा आढावा, पुरुष, ज्येष्ठ नागरिक व कुटुंब संस्था यांचे कायदेशीर अधिकार, खोट्या गुन्हे नोंदी व त्यावरील प्रतिबंधात्मक व न्यायालयीन उपाय, संयुक्त कुटुंब पद्धतीचे सामाजिक व कायदेशीर महत्त्व आदी विषयवार चर्चा होईल.
द्वितीय सत्रात विचारमंथन व मार्गदर्शन याबरोबर जेष्ठ विधिज्ञांचे मार्गदर्शन, सामाजिक कार्यकर्त्यांचे अनुभव व प्रत्यक्ष प्रकरणांचा आढावा, प्रश्नोत्तर व मुक्त चर्चा, ठराव व शिफारसी तसेच कायद्यात आवश्यक दुरुस्ती संदर्भातील प्रस्ताव, कुटुंब संरक्षण व सामाजिक समन्वयासाठी ठराव मांडणी व मंजुरी आदि विषयवार उहापोह करण्यात येईल. यात समितीचे संस्थापक एड. धर्मेंद्र चव्हाण, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुनील घाड़गे, एड. संतोष शिंदे, एड. बालासाहेब पाटिल, एड. मधुकर भीसे, एड. जयेश भावसार, एड. शिवाजीराव कराले पाटिल मार्गदर्शन करतील.
कायद्याच्या गैरवापराने उधवस्थ कुटुंब संस्था व विवाहव्यवस्था वाचवने, पुरुष्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी खास करून अधिवेशनात पुरुष आयोगाचे गठन त्वरित होऊन फैमिली वेलफेयर एक्ट अस्तित्वात यावा याकरिता चर्चा होईल. त्यानंतर समारोप सत्र व आभार प्रदर्शन होईल.
अधिवेशनाचे आयोजन अँड बाबु डी गावंडे, एड. संग्राम गायकवाड यांनी केले असुन पुरुष हक्क संरक्षण समिती, नांदेड प्रसिद्धी प्रमुख एड. विक्की टाकळीकर, एड. अरविंद केळे, एड. प्रिंयका कैवारे, एड. खंडु गायकवाड, ऋषी संतान, कैलाश कल्याणकर आदी परिश्रम घेत आहेत. अधिक माहिती साठी संपर्क साठी आवाहन एड. संतोष शिंदे माे.७५०७००४६०६ व एड. बापू गावंडे संपर्क : ८७८८१९९३३५ यांनी केले आहे.







