Home महाराष्ट्र फलटण तालुक्यातील आंबेडकरी चळवळ चारी बाजूंनी शत्रुंनी घेरली..? अजित मोरे ,ता.अध्यक्ष भीम...

फलटण तालुक्यातील आंबेडकरी चळवळ चारी बाजूंनी शत्रुंनी घेरली..? अजित मोरे ,ता.अध्यक्ष भीम आर्मी

226

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.22फेब्रुवारी):-आज सध्याची परिस्थिती खुप विचीत्र आणि निराशाजनक आहे असेच म्हणावे लागेल .कारण, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षांपासून चालत आलेल्या उच्च निच्चतेला सामाजिक विषमतेला नष्ट करून नवा समाज निर्माण केला जो भारतीय संविधान व्दारे समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या सिध्दांतावर आधारीत आहे . या सिध्दांता मुळे या देशात खरे समतेचे लोकशाहीचे वारे वाहू लागले सर्वांना समान हक्क, न्याय ,मिळु लागला

परंतु हे हक्क मिळत असता त्या हक्कांचे रक्षण करण्याची जबाबदारी हि सर्व नागरिकांची असुन प्रमुख्याने या हक्कांच्या अंमलबजावणी साठी रक्षणासाठी तत्पर असणारी आंबेडकरी चळवळ आज ठोस भुमीका घेत नसल्याने जनु तिला चारी बाजूंनी शत्रुंनी घेरली आहे . अशी स्थिती झाली असल्याणे भीम आर्मी संघटनेचे ता अध्यक्ष अजित मोरे यांनी चिंता व्यक्त केली आहे असुन . येथून पुढे तरी देशाच्या ऐकतेसाठी, मुलभुत हक्कासाठी, लोकशाही साठी आपण सर्व देशवाशी यांनी स्वाभिमानी लढा दिला पाहिजे, आंबेडकरी चळवळ गतीमान केली पाहिजे अशी भावना व्यक्त केली..