Home अमरावती किशोर राऊत यांचा भारतीय कृषक समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न 

किशोर राऊत यांचा भारतीय कृषक समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न 

91

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क )

अमरावती(दि.22फेब्रुवारी):- सामाजिक कार्यकर्ते व दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँक,टोपेनगर,अमरावती शाखेचे व्यवस्थापक व सामाजिक कार्यकर्ते मा.किशोर राऊत यांची भारतीय कृषक समाजाच्या अमरावती जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बँकेच्या टोपे नगर येथील शाखेत दि.२० फेब्रुवारी २०२६ ला कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठानतर्फे शॉल,श्रीफळ पुष्पगुच्छ व प्रा.श्रीकृष्ण बनसोड लिखित पुस्तक देऊन प्रतिष्ठानचे अध्यक्ष साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले, दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बॅकेच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे R.0.मॅनेजर सतीश बेडसे,समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड,प्रा.बाबुराव शेळके,प्रा.कैलास कडू,रंजना निचळ यांनी भावपूर्ण सत्कार केला.

     याप्रसंगी प्रा.अरुण बुंदेले यांनी,” मा.किशोर राऊत या सामाजिक कार्यकर्त्याचे भारतीय कृषक समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो.कृषकांच्या समस्या सोडविणारे एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे मा.श्री किशोर राऊत आहेत. कृषकांच्या विविध समस्या या समाजाच्या माध्यमातून ते 

सोडवतील यात शंका नाही.” असे विचार व्यक्त केले.तसेच सतीश बेडसे यांनी मनोगत व्यक्त केले . तर किशोर राऊत यांनी सत्काराला उत्तर दिले.

         याप्रसंगी अनिल चव्हाण, दीपक मानकरसह बहुसंख्य श्रोतावर्ग उपस्थित होता .

             कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड,संचालन कु.पल्लवी ठाकरे,आभार कु.अनिता राऊत यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने झाली .