Home महाराष्ट्र पिंप्री खुर्द ग्रामपंचायतीत राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी

पिंप्री खुर्द ग्रामपंचायतीत राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी

189

✒️धरणगांव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)

धरणगांव(दि.24फेब्रुवारी):-ग्रामपंचायत पिंप्री खुर्द येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्वच्छता, सामाजिक समता आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणाऱ्या गाडगे महाराजांच्या कार्याचा यावेळी स्मरण करून उपस्थितांनी त्यांच्या विचारांचे आचरण करण्याचा संकल्प व्यक्त केला.

या कार्यक्रमास सरपंच कमलताई धोबी, उपसरपंच धनराज मनोरे, ग्रामसेवक मुरलीधर उशीर तसेच ग्रामपंचायत सदस्य मंगल अण्णा पाटील, शांताराम मोरे, सुनील बडगुजर, नाना बडगुजर, रुक्सानाबाई खाटिक, सरला लोखंडे, सरला बाई बडगुजर, अनुसयाबाई सोनवणे व छायाताई मोहकर उपस्थित होते.

तसेच ग्रामस्थ ईश्वर दादा धोबी, शिवाजी महाजन, आबा धोबी, मनोज पांडे, मोहन शिंदे, गौतम दोडे, सिराज कुरेशी, रमेश पांडे, बाबूलाल बडगुजर, गिरीश ठाकुर, निलेश बडगुजर, रोहित मोरे, पुंडलिक चौधरी, अजय बच्छाव, बापू बच्छाव, प्रल्हाद धोबी व नितीन वजिरे यांनीही उपस्थित राहून अभिवादन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी गाडगे महाराजांच्या समाजप्रबोधन कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गावातील स्वच्छता व सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.