Home महाराष्ट्र महात्मा फुले हायस्कूल येथे मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा !

महात्मा फुले हायस्कूल येथे मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा !

121

▪️मराठी विषय शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा !

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील)

धरणगाव(दि.27फेब्रुवारी):- शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे २७ फेब्रुवारी “मराठी राजभाषा गौरव दिन ” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी डी पाटील यांनी केले.

       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्याज्येष्ठ शिक्षिका एम के कापडणे होते. मान्यवरांच्या हस्ते मराठी भाषेचे कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.मराठी दिनाचे औचित्य साधत मराठी विषयाचे शिक्षक एच डी माळी व एस एन कोळी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शाळेत सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. शाळेतील मराठी विषय शिक्षक एच डी माळी व एस एन कोळी यांनी मराठी दिनाविषयी विस्तृत माहिती सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्षा कापडणे मॅम यांनी मराठी भाषा आपला अभिमान आहे मराठी भाषेवर प्रेम करा असा संदेश दिला.

          कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी डी पाटील तर आभार एस व्ही आढावे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.