

राजुरा 19 मार्च
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती पाचगाव तर्फे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जाती व बारा बलुतेदार मावळ्याना सोबत घेउन निर्माण केलेले स्वराज्य आणि छ. संभाजी महाराज यांनी स्वराज्य रक्षणासाठी दिलेले बलिदान याची माहिती व्हावी याकरिता जिल्हा परीषद शाळेच्या पटांगणात शिव चरित्र व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उद्धव पाटील चौधरी यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.दिलीप चौधरी, जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड,चंद्रपूर, मुख्य अतिथी म्हणुन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, ग्राम पंचायत सदस्य बापुराव मडावी, मुख्य आयोजक मनोज कुरवटकर , पोलीस पाटील शंकर खामनकर, तमुस अध्यक्ष प्रकाश कोहपरे, लक्ष्मण नुलावार, कृ.उ.बाजार समिती सदस्य तिरूपती इंदुरवार,पं.स.माजी सदस्या सुनंदा डोंगे,मालन पाल,दशरथ भोयर, सुधाकर गेडेकर, मुख्याध्यापक संजय दुधे, बंडु पा.डोंगे, यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक तथा ग्रा.प.सदस्य मनोज कुरवटकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन रूपेश गेडेकर व दिलीप घ्यार यांनी केले. प्रास्ताविक बापुराव मडावी यांनी तर आभार गोपाल जंबुलवार यांनी मानले.जि.प.शाळेचे शिक्षक जहीर खान,सुधाकर कुळसंगे,शिक्षिका वर्षा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम , नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी यांनी प्रयत्न करून कार्यक्रम यशस्वी केला. यावेळी गावातील मुख्य चौकात छ.शिवाजी महाराज चौक असे नामांकन करणाऱ्या फलकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी डॉ. दिलीप चौधरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म ते मृत्यू आणि त्यानंतर घडलेल्या ऐतीहासिक घडामोडींवर माहिती दिली. मानवी जिवनात शिव चरित्र वाचल्याने कसा बदल होतो हे उदाहरणे दाखले देत सांगितले. गावाच्या विकासासाठी प्रत्येकाच्या हाताला कामं ही आवश्यकता आहे असे प्रतिपादन चौधरी यांनी केले. अविनाश जाधव, बादल बेले, लक्ष्मण नुलावार यांनी मनोगत व्यक्त केले.



