Home चिमूर गुरूकुंज आश्रम मोझरी येथे ” राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विमानतळ” निर्माण करावे!!

गुरूकुंज आश्रम मोझरी येथे ” राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विमानतळ” निर्माण करावे!!

94

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.10ऑक्टोबर):-विदर्भातील पंढरपूर म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या गुरूकुंज आश्रम मोझरी जि.अमरावती येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विमानतळ निर्माण करावे अशी मागणी अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवा मंडळ गुरूकुंज आश्रमचे जीवन प्रचारक राजेंद्र मोहितकर गुरूजी चिमूर यांनी केलेली आहे.

         गुरूकुंज आश्रम मोझरी येथे सतत देशविदेशातून अनेक प्रवासी,पर्यटक,लेखक,साहित्यिक व सामाजिक, राजकिय क्षेञातील गणमान्य लोक व श्रद्धाळू भाविकभक्त येत असतात.दरवर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्य पाच ते दहा लाख लोक गुरूकुंज आश्रम येथे येत असतात.

         हे सर्वसामान्य लोकांचे श्रद्धास्थान,प्रेरणास्थान व उर्जाकेंद्र आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचेवर प्रेम करणारा माणूस जगाच्या कानाकोपर्यात आहे.जनतेच्या सोईसुविधेसाठी इथे विमानसेवा सुरू करणे ही काळाची गरज आहे.गुरूकुंज आश्रम मोझरी येथे आजपर्यंत राष्ट्रपती,पंतप्रधान,मंञी,आमदार ,खासदार व अनेक गणमान्य व्यक्ती आलेल्या आहेत.राष्ट्रसंताच्या महासमाधीवर ते नतमस्तकही झालेले आहेत.अशा महान,पविञस्थळी विमानसेवा सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे.यासंबंधी महाराष्ट्र राज्याच्या सरकारने एक शिफारस प्रस्ताव भारत सरकारकडे पाठवावा अशी आग्रही मागणी जीवन प्रचारक राजेंद्र मोहितकर गुरुजी यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पञकातून केलेली आहे.