वर्षा कोयचाळे राज्यस्तरित व राष्ट्रिय स्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित.

96

 

राजुरा 19 मार्च
वर्षा कोयचाळे एक खेळाडू व्यक्तिमहत्व आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये स्वतःसाठी व समाजासाठी खूप चांगल कार्य केले आहे .त्यांच शिक्षण हे श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे पूर्ण केलं. शिकत असतांना तिला खेळामध्ये व समाजकार्यामध्ये खूप आवड होती,अजूनही त्या समाजामध्ये कार्यरत आहे. त्या सद्या चंद्रपूर वन प्रशासन,विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी चंद्रपूर येथे पी.टी. आय. म्हणून कार्यरत आहे. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेमार्फत समाजामध्ये त्यांचे पर्यावरण संवर्धन व मानवता विकासाचे कार्य सूरू आहे. या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये अमूल्य योगदान आहे. डिसेंबर मध्ये बेंगुळूर येथे झालेल्या आशियन मास्टर अथलॅटिक्स मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्या राजुरा बॉक्सिंग तालुका कोषाध्यक्ष आहे व चंद्रपूर मास्टर अथलॅटिक्स च्या सदस्य आहे . त्यांचा या कार्याची दखल घेत अविष्कार फाऊंडेशन इंडिया यांच्या तर्फे हा राज्य व राष्ट्रीय स्तरावरील राजमाता जिजाऊ पुरस्कार महिला दिनानिमित्त समाजामध्ये उत्कुष्ट कार्य करणाऱ्यांना देण्यात आला आहे. दिनांक १६ मार्च ला नागपूर येथे या पुरस्कार गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. अविष्कार फाउंडेशन चे राष्ट्रिय अध्यक्ष संजय पवार , उत्तर भारत विभागीय अध्यक्ष डॉ. अशोक कपटा व नागपूर जिल्हा अध्यक्ष सुधाकर पाटील यांची प्रामुख्याने उपस्थीती होती. या सर्वांचे श्रेय कोयचाळे व कुळमेथे परिवार यांना दिले आहे .वन प्रशासन ,विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी चे संचालक श्रीनिवास रेड्डी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले ,महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष बबलू चव्हाण, विभागीय अध्यक्ष विजयकुमार जांभुळकर , चंद्रपूर मास्टर अथलॅटिक्स अध्यक्ष सुरेश तुमे , अडपेवार् सर, पूर्वा खेरकर, प्रा. संगीता बांबोडे ,मयूर खेरकर , मातारदेवी गावचे पोलीस पाटील अजय कोयचाळे या सर्वांनी या पुरस्काराबद्दल पुढच्या वर्षा कोयचाळे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.