

✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.25मार्च):- सेल्फ रिसपेक्ट मुव्हमेंट चंद्रपूर तर्फे बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी आपली लेखणी हे झिजवून तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, पेरियार रामास्वामी या महामानवांनी समाज उत्थानासाठी केलेल्या कार्याचा खरा इतिहास बहुजन समाजाला सांगणारे इतिहासाचार्य प्रा. मा. म. देशमुख यांना आदरांजली वाहण्याकरिता विविध सामाजिक संघटनांच्या वतीने स्थानिक जाटपुरा गेट परिसरातील सेल्फ रिसपेक्ट मुव्हमेंटच्या कार्यालयात रविवार दिनांक 23 मार्च 2025 ला सभेचे आयोजन करण्यात आले.
सभेच्या अध्यक्षस्थानी सेल्फ रिसपेक्ट मुव्हमेंटचे मुख्य संघटक बळीराज धोटे हे होते.या आदरांजली सभेचे संचालन व प्रास्ताविक बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे यांनी केले.
प्रसंगी सेल्फ रिसपेक्ट मुव्हमेंटचे संघटक आनंद वनकर, भाऊराव मानकर, प्रा सुरेश विधाते, राहुल गायकांबळे, दामोदर रामटेके,साधू मुसळे, एससी एसटी ओबीसी डब्ल्युसीएल कर्मचारी संघटनेचे भास्कर सपाट, डॉ बाबासाहेब आंबेडकर न्याशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स बानाई चंद्रपूरचे सचिव इंजिनिअर किशोर सवाने सम्राट नागरी पतसंस्था चंद्रपूरचे अध्यक्ष आणि सामाजिक व साहित्यिक चळवळीत कार्यरत असणारे कोमल खोब्रागडे,बहुजन समाज पार्टीचे यवतमाळ येथील पदाधिकारी डॉ.सिद्धार्थ पाटील ,बहुजन समाज पार्टी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे कोषाध्यक्ष शंकर मेश्राम, कम्युनिस्ट चळवळीचे प्रा .दत्ता सर, सत्यशोधक समाज विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रा. माधव गुरनुले, अडव्होकेट प्रशांत सोनुले, आनंद आंबेकर, थेंब गृपचे अडव्होकेट राजेश वनकर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे चंद्रपूर जिल्ह्याचे संघटक पी. एम. जाधव, सेल्फ रिसपेक्ट मुव्हमेंटचे संघटक नीलकंठ पावडे, लोकराज्य पार्टी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष नवनाथ देरकर , इत्यादी मान्यवरांनी स्मृतीशेष प्रा मा.म. देशमुख सरांच्या वैचारिक लढ्याला अधिक व्यापक करण्याची गरज बोलून दाखविली.



