

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमरावती(दि.23):-सुधीर प्रकाशन,वर्धा व वऱ्हाड विकास,अमरावती तर्फे आयोजित फुले – शाहू – आंबेडकरी चळवळीला गतिमान करणारे समता सैनिक समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांच्या ” विद्रोही महात्मा” व ” महात्मा फुले आणि अस्पृश्यांची कैफियत ” या दोन्ही पुस्तकांना राज्यातील पुरोगामी विचारांच्या वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर त्यांचे दहावे पुस्तक ” राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचे क्रांतिकार्य आणि सन्मान सावित्रींच्या लेकींचा ” या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ दि.२६ मार्च २०२५ (बुधवार) ला पोदार इंटरनॅशनल स्कूल,कठोरा रोड,अमरावती येथे संपन्न होत आहे.
प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध विचारवंत मा.प्राचार्य सुधीर महाजन (पोदार इन्टरनॅशनल स्कूल,अमरावती.) तर प्रमुख अतिथी मा.प्राचार्या डॉ.कमलताई गवई (माजी लेडी गव्हर्नर ),मा.श्री.विलासराव मराठे (प्रबंध संपादक,दै. हिंदुस्थान ),मा.डॉ.गणेशराव, खारकर (माजी उपमहापौर), मा.डॉ.मेघना वासनकर-बगडे, (उपायुक्त,मनपा,अमरावती.),मा. श्रीमती अपर्णा यावलकर डांगोरे (माहिती अधिकारी,अमरावती.), मा.श्रीमती स्मिताताई सं. घाटोळ(जिल्हाध्यक्षा,महिला आघाडी),मा.प्रा.डॉ.उज्ज्वला सु. मेहरे(कार्याध्यक्ष,महिला आघाडी जिल्हा), मा.श्री.सुधीर गवळी(सुधीर प्रकाशन, वर्धा.)उपस्थित राहणार असून
पुस्तकाची समीक्षा साहित्यिक मा.प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले हे करणार आहेत.
प्रकाशन समारंभाचे आयोजक सौ.रजनी दी. आमले,ओमप्रकाश अंबाडकर, इंजि.भरतराव खासबागे, सुरेशराव मेहरे, मधुकरराव आखरे,रामकुमार खैरे, गोविंदराव फसाटे,वसंतराव भडके,सुधीर घुमटकर,सौ.नंदा बनसोड, पोलीस पाटील सौ.कविता नरेंद्र पाचघरे,प्रा.शारदा अ. गणोरकर, सों. कीर्ती निलेश म्हसकर यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.



