✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
जळगाव(दि.26मार्च):- येथील प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांची जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ , नागपूर तर्फे ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार करिता निवड करण्यात आली आहे.
महामंडळाचे अध्यक्ष डॉ. दीपककुमार खोब्रागडे , सरचिटणीस डॉ. प्रकाश करमाडकर यांनी पुरस्कार निवडीचे पत्र प्रदान केले आहे . सदरचा पुरस्कार त्यांना दिनांक ३० मार्च रोजी मधुरम सभागृह , सीताबर्डी , नागपूर येथे मान्यवरांच्या हस्त्ये देण्यात येणार आहे .
जयसिंग वाघ हे १९८२ पासून विविध सामाजिक , साहित्यिक चळवळीत सक्रिय असून ते अतिशय निर्भिडपणे आपले विचार मांडतात . त्यांचे विविध दैनिकांमध्ये सातत्याने लेखन सुरू आहे . त्यांच्या सात पुस्तकांचे प्रकाशन झालेले आहे .त्यांच्या या निवडी मुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.