

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.26मार्च):-गंगाखेड येथील नगरपरिषद कार्यालय समोर आरटी.आय कार्यकर्ता रोहीदास लांडगे यांनी दिनांक 24 मार्च 2025 पासून माहिती अधिकाराची माहिती उपलब्ध करून दिली नाही म्हणून सुरेश मनियार या नगरपरिषद कर्मचारी गंगाखेड यांच्या कामाची चौकशी करून निलंबित करण्यात यावे यासाठी अमरण उपोषणा बसले आहेत.
सविस्तर माहिती अशी आहे की नगरपालिकेच्या मालकीचे शॉपिंग कॉम्प्लेक्स दिनांक 1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर २०२३ च्या कालावधीत दुकानाचे हस्तांतरण व नामांतरण करण्यात आले आहे. त्यांच्या नावासहित माहिती व सर्व संचिकाची कागदपत्राची सत्यप्रत देण्यात यावी तसेच या प्रकरणात नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभे मध्ये ठराव झालेला असल्यास त्याची पण सत्य प्रत देण्यात यावी याबाबत माहिती मागण्यात आली होती. परंतु या विभागाचा लिपीत सुरेश मणियार यांनी जाणून बुजून टळाटाळ करण्यात आली आहे.
प्रथम माहिती अधिकार कलम 6(1) नुसार 28/ 11/ 2023 दिला होता, त्या नंतर प्रथम अपील 19(1) नुसार 02/01/2024 ला केली होती, परंतु अपील केलेली माहिती मनियार यांनी लपवली असून ती एच. ओ. मुख्यधिकारी नगर परिषद गंगाखेड यांच्या निदर्शनास आणून दिली नाही, तसेच नगर परिषद च्या मालमत्ता हस्तातरंण प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झालेला दिसून येतो, परंतु माहिती अधिकार अधिनियम 6(1)प्रमाणे माहिती उपलब्ध करून देण्यात येत नाही ही गंभीर बाब आहे. असे प्रकारे निवेदन देण्यात आले असून या निवेदनावर उपोषण करता रोहिदास लांडगे स्वाक्षरी केली आहे



