

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड /सातारा(दि.26मार्च):-शैक्षणिक वारसा लाभलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक संस्थेच्या समोर कर्मवीर आण्णा यांचे उभे राहत असलेले भव्य दिव्य स्मारक व या स्मारकासमोरच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान भवन उभा करावे यासाठी देवापुर बौद्ध समाज एकवटला असून या गुरू शिष्याच्या समोरा समोरीला स्मारकास देवापुर ग्रामपंचायतीने या जागेला विरोध न करता व जुन्या जागेवर बसत नसलेले व जबरदस्तीने बसवण्याचा खटाटोप थांबवू देवापुर ग्रामपंचायतीने गावाचा ऐतिहासिक वारसा जतन करून
ग्रामपंचायतीने राजकारण बाजूला ठेवून सामंजस्याची भुमिका घेण्याची मागणी बौद्ध समाजा तर्फे होत असून ग्रामपंचायतीने गावठाण, गायरान व तलावातील अतिक्रमणे काढण्यासाठी पुढे यावे ऐतिहासिक कामासाठी राजकारण न करता विकासाचे राजकारण करावे
गेले अनेक दिवसांपासून देवापुर ग्रामपंचायत हद्दीत संविधान भवन बांधण्याच्या जागेवरून देवापूर ग्रामपंचायत सरपंच , पदाधिकारी आणि देवापुर येथील बौद्ध समाज यामध्ये वाद सुरू असून ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांनी काही समाज बांधव हातासी धरुन एक वर्षै हि अजून ७ लाख रुपये खर्च केलेल्या पळसवडे रोडवरील समाज मंदिरास झाले नाही त्या दिड गुंठे जागेवर २४ लाख रुपये किमतीचे संविधान भवन आठ ते नऊ महिन्यापूर्वी बांधलेले समाज मंदिर पाडून त्या ठिकाणी संविधान भवन बांधणार का ? एक गुंठ्यावर पेव्हर बाॅल्क टाकलेले फोडणार का? सहा महिन्यापूर्वी समाजकल्याणचे ७ लाख रुपये ग्रामपंचायतीने खर्च केलेल्याचं काय ❓असे एक ना अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित होत असून देवापुर ग्रामपंचायत व सदस्य यांनी सामंजस्याने संविधान जागेचा पेटलेला मुद्दा सोडवून बौद्ध समाज व ग्रामपंचायत यांच्या मध्ये पडलेली सामाजीक दरी संविधान भवन जागेवरून जातीय रंग देवून निर्माण होणार नाही याची दक्षता बौद्ध व ग्रामपंचायत यांनी घेऊन कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ बाबासाहेब आंबेडकर या गुरू शिष्याच्या समोरा समोरील ऐतिहासिक बांधकामास ग्रामपंचायतीने विरोध न करता सोडवून पडत चाललेली सामाजीक दरी पडणार नाही यासाठी एक पाऊल टाकावे ?
देवापुर या गावाला शिक्षणाचा ऐतिहासिक वारसा देऊन परिसरातील दीनदुबळ्या गरीब मुलांसाठी शिक्षणाची कवाडे उघडी करून कमवा व शिका हे शिक्षण ग्रामीण भागातील मुलांना मिळावे यासाठी शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील , संत गाडगेबाबा व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण संस्था उभी करण्यासाठी आर्थिक मदत वेळोवेळी देवू केली होती त्याकाळात या गुरु शिष्याचे दाखले आज हि पहावयास मिळतात कर्मवीर आण्णा यांनी स्वता मुक्कामी राहुन देवापुर तलावा नजिक शासकीय जागेवर शाळा उभी केली व या ठिकाणी स्वता कर्मवीर आण्णा अनेक वर्षी राहिले होते त्याची आठवण म्हणून रयत शिक्षण संस्थेने कर्मवीर आण्णा राहत असलेल्या जागेवर भव्य दिव्य स्मारक उभे रहात आहे सातार्या नंतर माण तालुक्यातील देवापुर याठिकाणी हे स्मारक होत आहे हि गोष्ट देवापुर पंचक्रोशीसाठी अभिमानाची बाब आहे कर्मवीर आण्णा यांच्या स्मारकासमोर आरोग्य केंद्राच्या नजिक असलेल्या शासकीय ६ गुंठे गायरान जागेवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान भवन हे कर्मवीर आण्णा यांच्या स्मारका समोर संविधान भवन उभारुन गुरू शिष्याच्या कार्याची महती सांगणारी ऐतिहासिक वारसा हि दोन्ही स्मारके आजच्या पिढीला प्रेरणादायी ठरणारी आहे देवापुर ग्रामपंचायत या जागेला विरोध करुन २४ लाखाच्या संविधान भवनाची इमारत अपूर्ण जागेवर ज्याठिकाणी हे भवन बसतो नाही त्याठिकाणी बांधकाम करण्याचा हाटांहास कशासाठी देवापुर ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी विचार करावा व जिल्हाधिकारी यांनी दिनांक ६ मार्च रोजी आरोग्य उपकेंद्रा नजिक असलेल्या जागेचा प्रस्ताव पाठवण्या संबधी लेखी पत्र दिले आहे त्याचे उत्तर ना ग्रामसेवक देत आहेत ना सरपंच , ना माणचे बीडीओ बौद्ध व ग्रामपंचायत यांच्या मधील सामाजिक तेड निर्माण होणार नाही याची काळजी देवापुर ग्रामपंचायत घेणार का?
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे हस्ते जुन्या समाज मंदिराच्या सव्वा गुंठे जागेत उदघाटनाचा जो निर्णय घेतला आहे तो देवापुर येथील बौद्ध समाजाच्या भावनाचा विचार करून मंत्री महोदय यांनी कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ बाबासाहेब आंबेडकर या गुरू शिष्याच्या समोरा समोरील स्मारकाला ऐतिहासिक वारसा देण्याचे काम करावे असी मागणी देवापुर बौद्ध समाजा तर्फे करण्यात येत आहे



